प्रतिनिधी
नागपूर : राहुल गांधी वीर सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उद्धव, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही, काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर हल्लाबोल केला.Veer savarkar gaurav yatra in nagpur; devendra fadnavis targets Uddhav Thackeray for supporting rahul Gandhi
वीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुधांधु त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रामुख्याने उपस्थित होत्या. जर वीर सावरकर यांनी त्याग केला नाही असे म्हटले जात असेल, तर कुणीच त्याग केला नाही असे म्हणावे लागेल, असे गडकरी म्हणाले.
खुद्द महात्मा गांधी यांनी वीर सावरकर यांना प्रखर देशभक्त आणि साहसी म्हटले होते. जे महात्मा गांधी यांना कळले ते आताच्या राहुल गांधी यांना कळाले नाही, असे खासदार सुधांधु त्रिवेदी म्हणाले. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केला म्हणून वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याची संधी मिळाली. घराघरांत वीर सावरकर पोहचत आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांचे आभार. असेच काम त्यांनी करावे. मरता क्या न करता, अंधेरी रात मे दिया तेरे हात में असे राहुल गांधी यांचे झाले आहे. ‘डुबाओ रे पार्टी’ ही मोहीम सुरू रहावी, असेही गडकरी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी कविता लिहिल्या आणि त्या मुखोद्गत केल्या. स्वत: यातना भोगताना इतरांना यातनांतून मुक्त करण्याचे काम वीर सावरकरांनी केले.
वीर सावरकरांनी जे अनन्वित अत्याचार भोगले, ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना काय समजणार? अस्पृश्यता संपविण्यासाठी त्यांनी पतितपावन मंदिराची निर्मिती केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहात वीर सावरकरांनी पुढाकार घेतला.
मुधोजीराजे भोसले यांनी मला इंदिरा गांधी यांचे पत्र दिले. त्यात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे. संसदेत जेव्हा ठराव आला, तेव्हा राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी यांनी पाठिंबा दिला. राहुल गांधी आपल्या आजी – आजोबांचेही विचार पाळत नाहीत.
राहुल गांधींवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही. पण, काही लोकांचे मला नवल वाटते…
उद्धव ठाकरे, कोण होतास तू, काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू…
सत्ता येईल, सत्ता जाईल. पण, उद्धवजी, इतिहासात तुमचे नाव कायमचे कोरले जाईल. हिंदुत्त्वाचे विरोधक आणि सावरकरांचा द्वेष करणार्यांच्या यादीत तुमचे नाव कायमचे कोरले गेले आहे.
उद्धव ठाकरे, फडतूस नही मैं काडतूस हूँ मैं… याँद रखना, झुकेगा नही, मैं तो घुसेगा…
सडक्या आणि कुजक्या मेंदूचे लोक जोवर आहेत, तोवर ही सावरकर गौरव यात्रा सुरू राहील. त्यांचे मेंदू दुरुस्त होईस्तोवर आमचा लढा सुरू राहील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App