विशेष प्रतिनिधी
हिंगोली : कॉँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या अकाली निधनांतर हिंगोलीच्या पालक मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या विरोधकांना बळ देण्यास सुरूवात केली आहे. कायम गटबाजीने पोखरलेल्या हिंगोलीतील काँग्रेसमध्ये आता नवा गट पडला असून, त्यांच्यातील धुसफुस चव्हाटय़ावर आली आहे. सातव-गोरेगावकर गटाला हाताच्या अंतरावर ठेवून पालकमंत्री वर्षां गायकवाड यांचे उघडपणे नेतृत्व मानणारा कार्यकर्त्यांचा समूह पुढे आला आहे.Varsha Gaikwad’s strength to Rajiv Satav’s opponents, new factionalism started in Hingoli Congress
हिंगोलीत दिवंगत खासदार राजीव सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यात शीतयुद्ध चालायचे. दिवंगत सातव यांनी वर्षां गायकवाड यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा तसेच त्याच हिंगोलीच्या पालकमंत्री व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळेच गायकवाड-सातव कुटुंबातील स्नेह हा राजीव यांच्या निधनानंतरही अनेक दिवस कायम होता.
मात्र, राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बीडच्या रजनी पाटील यांना राज्यसभेवर संधी मिळाल्यानंतर सातव कुटुंबाचे राजकीय पुनर्वसन कसे होते, याकडे लक्ष लागले होते. राज्यात विधान परिषदेची एक जागा रिक्त झाल्यानंतर मात्र त्यावर संधी मिळण्यासाठी सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांचे नाव नक्की केले जाईल असे मानले जात होते.
पण तेव्हा पालकमंत्री गायकवाड यांचे समर्थक सिद्धार्थ हत्तीहंबिरे यांचे नाव पुढे केले. येथूनच सातव-गोरेगावकर गटाला अंतरावर ठेवत गायकवाड गटाचीही बांधणी सुरू असल्याचे दिसून येऊ लागले. हत्तीहंबिरे यांनी अलीकडेच पालकमंत्री गायकवाड यांच्या अभीष्टचिंतनासाठी लावलेल्या फलकावर सातव परिवारातील सदस्यांना दूर ठेवल्याचे दिसले होते.
त्याला विधान परिषदेचे संदर्भ जोडले जात आहेत. सिद्धार्थ हत्तीहंबिरे हे एके काळी राजीव सातव गटाचे मानले जात. त्यांनीच लावलेल्या एका फलकावर राजीव सातव यांच्या छायाचित्राला स्थान नव्हते.डॉ. प्रज्ञा सातव व पालकमंत्री गायकवाड यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
हिंगोलीतील काँग्रेसमधील वाढत्या गटबाजीची दखल राज्य पातळीवरही घेतली जात आहे. श्रेष्ठींच्या निदेर्शावरून पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी काँग्रेसअंतर्गत गटाचे मनोमीलन करण्यासाठी हिंगोलीत प्रयत्न केले. ही बैठकही मुद्दय़ावरून गुद्दय़ावर गेली. त्यामुळे पक्ष निरीक्षक देशमुख यांना काढता पाय घ्यावा लागला.
झालेली बैठक जिल्हाभर चचेर्चा विषय बनली होती. झालेल्या घटना प्रसंगाचा सविस्तर अहवाल देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला होता. हिंगोलीतील घडलेल्या घटनेनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या गटाचे मनोमीलन करण्यासाठी गेल्या आठवडय़ात मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत सातव गटाच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App