UPच्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन, मंत्रालयात काम करणाऱ्या परळीच्या इरफानला अटक

UP religion Conversion Gang beed Connection Exposed by ATS, arrested Irfan shaikh of parali

UP religion Conversion Gang : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पकडलेल्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीडमधून इरफान शेख नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. इरफान केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयात काम करत असल्याचे सांगितले जात आहे. UP religion Conversion Gang beed Connection Exposed by ATS, arrested Irfan shaikh of parali


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पकडलेल्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीडमधून इरफान शेख नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. इरफान केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयात काम करत असल्याचे सांगितले जात आहे. यूपी एटीएस धर्मांतर गँग प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात मोहम्मद उमर गौतम आणि मौलाना मुफ्ती काझी जहांगीर कासमी यांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या तपासणीत हे उघडकीस आले की या रॅकेटचे कनेक्शन केवळ यूपीच नाही, तर देशातील इतर राज्यांतही हे रॅकेट सक्रिय आहे. एटीएसच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, आतापर्यंत देशभरात एक हजाराहून अधिक लोक धर्मांतरित झाले आहेत. यासंदर्भातील माहिती अन्य राज्यांच्या पोलिसांनाही दिली गेली.

याच प्रकरणात चौकशी सुरू असताना बीड पोलिसांनी एका कर्मचार्‍यास अटक केली असून त्याचे नाव इरफान शेख असे सांगितले जात आहे. इरफान हा बीडचा रहिवासी असून तो दिल्लीतील केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयात काम करतो. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच मंत्रालयाशी संबंधित आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली होती.

इरफानचे प्राथमिक शिक्षण परळी तालुक्यातील सिरसाळा या त्याच्या मूळ गावी झाले आहे. इरफान गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत स्थायिक आहे. तिथे तो बालकल्याण विभागामध्ये दुभाषा म्हणून काम करतो. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात इरफान खानला उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुकाची थापही मिळाली होती.

धर्मांतर रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक झाली आहे. मोहम्मद उमर गौतम आणि मौलाना कासमी, इरफान शेख, गुरुग्राम येथील मन्नू यादव आणि दिल्ली येथील राहुल भोला यांना चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

UP religion Conversion Gang beed Connection Exposed by ATS, arrested Irfan shaikh of parali

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात