विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये २६/११ च्या हल्यातील खरे हिरो तुकाराम ओंबळे यांना शास्त्रज्ञांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळी जातीचे नाव आयसीयस तुकारामी असे नाव दिले आहे.Unique tribute to Tukaram Ombale who caught Kasab, named ICUS Tukaram for the new flying spider found in Maharashtra
महाराष्ट्रात एक नवी कोळी जात साडली आहे. ही जात शोधणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाने छापलेल्या अहवालात या नवीन जातीचे नाव आयसियस तुकाराम असे ठेवण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की महाराष्ट्रात जेनेरा फिनटेला आणि आयसिस या कोळ्याच्या दोन प्रजाती सापडल्या आहेत. त्यातील एका प्रजातीचे नाव २६/११ ला मुंबईला झालेल्या हल्यात दहशतवादी अजमल कसाब याला पकडणाºया तुकाराम ओंबळे यांचे नाव देण्यात आले आहे.
इंडियन स्पायडर अर्थात भारतीय कोळ्यांच्या जाती-प्रजातींवर संशोधन करणारे ध्रुव प्रजापती यांनी महाराष्ट्रात सापडलेल्या कोळ्यांच्या दोन नव्या जातींची आणि त्यांच्या शास्त्रीय नामकरणाबद्दलची माहिती ट्विटरवर जाहीर केली आहे. त्यापैकी एका जातीला शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या स्मरणार्थ आयसीयस तुकारामी असं नाव देण्यात आलं आहे.
या जातीचा कोळी ठाण्यात सापडला असल्याचं ध्रुव प्रजापती यांनी म्हटलं आहे. ‘शहीद तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आणि स्वत:च्या अंगावर 23 गोळ्या झेलल्या. त्यांच्या स्मरणार्थ कोळ्याच्या या नव्या जातीला त्यांचं नाव देण्यात येत आहे,’ असं ध्रुव प्रजापती यांनी लिहिलं आहे. पीएचडी करत असलेले निसर्गप्रेमी ध्रुव प्रजापती यांनी ट्विटरवरच्या वैयक्तिक माहितीत भारतीय सशस्त्र सैन्यदलांचा चाहता असल्याचंही आवर्जून लिहिलं आहे.
दुसºया नव्या जातीचा कोळी ठाणे आणि मुंबईतल्या आरे मिल्क कॉलनी परिसरात आढळल्याचं प्रजापती यांनी म्हटलं आहे. प्रजापती यांनी आपला मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ दुसºया जातीच्या कोळ्याला फिन्टेला चोळकी असे शास्त्रीय नाव दिल्याचे सांगितले.
रिसर्चगेट डॉट नेट नावाच्या वेबसाइटवर याबद्दलचा रिसर्च पेपर उपलब्ध आहे. ध्रुव प्रजापती यांच्यासह सोमनाथ कुंभार , जॉन सेलेब , राजेश सानप ) या चार जणांनी हे संशोधन करून रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तुकाराम ओंबाळे यांनी 26/11च्या हल्ल्याच्यावेळी पळून जात असलेले दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माइल खान यांना गिरगाव चौपाटीजवळ अडवलं. त्यांच्या या कायार्मुळे पोलिसांच्या दुसºयाटीमला कसाबला घेरणं आणि त्याला जिवंत पकडणं शक्य झालं.
ओंबाळे यांनी कसाबच्या समोर उभं ठाकून 23 गोळ्या अंगावर झेलल्या. त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचू शकले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना अशोक चक्र हा सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App