केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड – पंकजा मुंडे यांची भेट; मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल केले अभिनंदन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल कराड यांचे अभिनंदन केले. Union Minister of State for Finance Dr. Karad And Pankaja Munde Meet; Congratulations on your inclusion in the Cabinet

डॉ. भागवत कराड आणि पंकजा मुंडे यांची सुमारे तासभर गप्पांची मैफल रंगली. तसेच भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे साहेब आमचे नेते होते. आता पंकजा मुंडे असल्याचे उदगार कराड यांनी काढले.



केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य असलेले डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाले. अर्थराज्यमंत्री पदी निवड झाल्यावर त्यांनी आज प्रथमच पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे महाराष्ट्रातून भाजपचे प्रतिनिधी म्हणून दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. ते रविवारी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला हजर झाले. राष्ट्रीय सचिवांनी बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. तब्बल वर्षभरानंतर प्रथमच नड्डा हे राष्ट्रीय सचिवांना भेटले आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आपली बहीण आणि लोकसभा खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही म्हणून पंकजा नाराज असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे त्यांनी कोणतीच नाराजी नसल्याचे सांगितले आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील त्याच्या निकटर्तीयांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा यांच्या दिल्ली दौऱ्या दरम्यान हे राजीनामा सत्र सुरू झाल्याने हा एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Union Minister of State for Finance Dr. Karad And Pankaja Munde Meet; Congratulations on your inclusion in the Cabinet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात