केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर, बारसू आंदोलनाच्या ठिकाणी जाणार

प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी जे लोक रडताना पाहिले, तेच लोक प्रवेशासाठी भाजपच्या दारात उभे होते. शरद पवारांचा निर्णय हा वैयक्तिक आहे. मात्र, अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर आहेत असे वक्तव्य केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. यासह मी बारसूत प्रकल्पाच्या समर्थनार्थ जाणार अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली. Union Minister Narayan Rane said, Ajit Pawar will go to the Barsu protest site on BJP’s border

रडणारे भाजपच्या वाटेवर

शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, भावनांचा आदर करून निर्णय घेऊ, त्यावर राणे म्हणाले, राजीनामा मागे घ्यावा यासाठी जे लोक रडताना पाहिले ,तेच लोक प्रवेशासाठी बीजेपीच्या दारात उभे होते. शरद पवारांचा निर्णय हा वैयक्तिक आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न उपस्थित केला असता ते सीमारेषेवर आहेत असे राणे म्हणाले, संजय राऊत जे बोलतात ते ते खरे नसते पत्रकाराने त्यांच्या बातम्या दाखवू नये.


आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही उद्धव ठाकरेंच्या हाताशी राहत नाहीत – नारायण राणेंचं विधान!


 

उद्धव ठाकरे कोण आहेत?

६ तारखेला उद्धव ठाकरे बारसूत जाणार आहेत, त्याठिकाणी तुम्ही जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता, नारायण राणे म्हणाले, ”मी जाणार असून तो प्रकल्प कोकणामध्ये आला पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी प्रकल्पाच्या समर्थनार्थ जाणार आहे. १.३० लाख कोटी खर्चून हा प्रकल्प उभारत येत असताना तो येऊ नये म्हणून सांगणारे उद्धव ठाकरे कोण आहेत?

शेतकऱ्यांना ऊसदर मिळत नाही

सोलापुरात बेकारी, विकासाचे काही प्रश्न आहेत का? ते न उपस्थित करता तुम्ही ठाकरेचा प्रश्न उपस्थित करताय यावर ”ते अडीच वर्षे कमवून बसले आहेत. ते बेकार नाही असे राणे म्हणाले.

कोट्यवधी ची उलाढाल होणारे ४४ कारखाने सोलापूर जिल्ह्यात असताना शेतकऱ्यांना ऊस दर मिळत नाही, शेतकरी पिछाडीवर जात असताना उद्योग खाते काय करते? याबाबत विचारले असता उलट राणे यांनी पत्रकारांनी कधी आंदोलन चालवलं का? किती मिळायला पाहिजे याचा अभ्यास केला का?तुम्ही यासंबंधी बाजू घेत नाहीत. ऊस दर कमी मिळतो, म्हणून राज्यात आणि केंद्रात मी प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले.

Union Minister Narayan Rane said, Ajit Pawar will go to the Barsu protest site on BJP’s border

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात