बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शरसंधान

प्रतिनिधी

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ राजकारणासा ठी दुटप्पी भूमिका घेत आहेत. बार्शीतल्या 70% जनतेचा प्रकल्पाला पाठिंबाचा आहे. पण विरोधकांना त्यावरून राजकारण करायचे असल्याने ते स्थानिकांना उकसवत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. Uddhav Thackeray’s position regarding the Barsu project is two-fold

बारसू मध्ये लाठीचार्ज झालेला नाही. तेथे आंदोलक – पोलिसांमध्ये चर्चा झाली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलिस अधीक्षकांनी त्या संदर्भात मला माहिती दिली आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. बारसूतील जनतेला विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प पुढे न्यायचा आहे. त्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत स्थानिक नागरिक, आमदार – खासदार यांच्याशी चर्चा करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

बारसू मध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या जागी आंदोलक आणि अधिकारी यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर पोलिसांनी तेथे लाठीमारांनी अश्रू सोडल्याच्याही बातम्या आल्या. मात्र ही प्रत्यक्ष वस्तूस्थिती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या बारसूतली परिस्थिती शांत आहे असेही त्यांनी सांगितले.

मात्र त्याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर शरसंधान साधले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहून बारसूतील जागा निश्चित केली होती. पण मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि आता तर ते विरोधासाठी विरोधच करत आहेत. समृद्धी महामार्गालाही त्यांनी असाच विरोध केला होता. अडीच वर्षे त्यांच्या काळात केवळ अहंकारामुळे प्रकल्प ठप्प झाले होते. आता ते गेल्या 9 महिन्यांमध्ये आम्ही सुरू केले. त्यामुळे त्याचा त्यांना राग आला आहे, असे टीकास्त्र हे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले आहे.

Uddhav Thackeray’s position regarding the Barsu project is two-fold

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात