प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. मात्र आता प्रकाश आंबेडकरांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन या भेटीचा खुलासा केला आहे. Uddhav Thackeray should announce role soon prakash ambedkar
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे भेट होणारच आहे. पण प्रत्येक भेट राजकीयच असते, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. पण आता आम्ही तयार आहोत, उद्धव ठाकरेंनीही भूमिका जाहीर करावी.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जेव्हा मी काल सकाळी दिल्लीला होतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला होता. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना आपल्याशी भेटायचे आहे, असे सांगितले. तसंही मी मुंबईला येणार होतो. म्हणून मी होय म्हटलं. 10.30 वाजता मी त्यांना भेटायला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची नोएडा येथे प्रतिकृती होणार आहे, त्यासंदर्भात चर्चा केली.
पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल झालेला नाही. याची मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे. ज्या पक्षासोबत भाजप आहे, त्या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली नाही, याची त्यांना कल्पना आहे. पण शिंदेंनी भाजपाची साथ सोडली तरच त्यांच्यासोबत राजकीय चर्चा होऊ शकते, नाहीतर आमच्यात चर्चा होऊ शकत नाही. गेले ३५ वर्ष आम्ही या राजकारणात आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमचा खिमा केला. आम्ही अशी परिस्थिती असतानाही भाजपसोबत गेलो नाही. त्यावेळेस आम्ही गेलो असतो तर भाजपच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता. माझी ताकद मला माहित आहे. माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. त्यामुळे मला यात अजिबात रस नाही. आता अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. आम्ही आजही म्हणतो की, आम्ही शिवसेनेसोबत समझोता करण्यासाठी तयार आहोत.
महापालिकाच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे. पण सार्वजनिक घोषित झाली नाही. आम्ही फक्त एकमेकांना आश्वासन दिलं आहे आणि हे चार भिंतीच्या आतमधले आहे. आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचे की, चार भिंतीतलं आश्वासन कधी सार्वजनिक करायचं. पण उद्धव ठाकरेंचे म्हणणे आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन युती जाहीर करू. पण काँग्रेसला मी चांगला ओळखतो. माझ्या एवढा काँग्रेसला आणि शरद पवारांना ओळखणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही. पण जोपर्यंत निवडणुका घोषित होत नाहीत तोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र घेऊन युती जाहीर करण्याचा प्रयत्न करतील, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App