उद्धव ठाकरे म्हणाले सत्ता समोर दिसत नसल्याने एकत्र आलोय पण..


विशेष प्रतिनिधी

मुबंई : आज आपल्या समोर सत्ता दिसत नसल्याने एकत्र आलोय पण सत्तेची खुर्ची समोर दिसू लागल्यावरही एकत्र राहायला हवे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेल्या बैठकीत मांडली अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले,Uddhav Thackeray said that opposition parties have come together as they are not in power but.

काल सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत १९ पक्षांचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला कि आज आपल्या समोर सत्ता नाही. पण आज आपण एकत्र आलोय.. पण नंतर जर सत्ता दिसत असेल किंवा सत्तेची खुर्ची दिसत असेल तेव्हा सुद्धा आपण सर्वानी एकत्र राहील पाहिजे.तालिबान वाढत आहे हे सत्य आहे. तालिबानला पाकिस्तान आणि चीनचा पाठिंबा आहे हे देखील सर्वाना माहित आहे. तेव्हा भारत सरकार ने या शत्रू देशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली..

शिवसेनेच्या हिंदूत्वावर शंका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मोदी फडणवीस यांच्यापर्यंत सर्वाना माहित आहे.

बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्यांनी हात वर केले होते त्यांनी शिवसेने बद्दल बोलू नये. जेव्हा मुबंईत १९९३ ला पाकिस्तानने दंगली उसळल्या तेव्हा देखील शिवसेनेने आपले हिंदुत्व दाखवले होते.. तेव्हा शिवसेनेनेला असले टोमणे त्यांनी मारू नयेत.

Uddhav Thackeray said that opposition parties have come together as they are not in power but.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण