ठाकरे – आंबेडकर चर्चा : महाविकास आघाडीत चौथा पक्ष की महाविकास आघाडी फुटून ठाकरे – आंबेडकरांचीच तिसरी आघाडी??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बैठक होणार… नाही होणार… मग बैठक सुरू अशा बातम्यांनी रंगलेली ठाकरे – आंबेडकरांची चर्चा हॉटेल ग्रँड हयात मध्ये सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी हा चौथा पक्ष सामील होण्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. पण वंचितच्या रूपाने प्रकाश आंबेडकरांचा चौथा पक्ष महाविकास आघाडीत एंट्री घेणार की प्रकाश आंबेडकरांची मूळ अट कायम राहत राष्ट्रवादीला महाविकास आघाडीतून एक्झिट करून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची तिसरी आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येणार??, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. Uddhav Thackeray – Prakash Ambedkar new Alliance or new entry in MVA?

प्रबोधन डॉट कॉम च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा एकत्र आले. त्यावेळीच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या राजकीय जवळकीची चर्चा सुरू झाली होती. ग्रँड हयात हॉटेलातील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. कारण या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे सामील असल्याच्या आणि प्रकाश आंबेडकरांबरोबर सुजात आंबेडकर सामील झाल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. या बृहद बैठकीत नेमके काय ठरते हे ठाकरे आणि आंबेडकर हे दोन्ही नेते जाहीर करणार असल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले आहे.आंबेडकरांची मूळ ऑफर

पण प्रकाश आंबेडकरांची वंचित बरोबर आघाडी करण्याची मूळ ऑफर शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांनाच होती. राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची नाही, ही प्रकाश आंबेडकर यांची मूळ भूमिका होती. आता या भूमिकेत त्यांनी बदल केला आहे का? आणि राष्ट्रवादीसह अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीचा चौथा घटक पक्ष म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार आहेत का?, हा प्रश्न आहे.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची मूळ अट मान्य करून उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीला महाविकास आघाडीतून वगळून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची तिसरीच आघाडी महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात आणणार का?, हाही प्रश्न तयार झाला आहे. या प्रश्नांची उत्तरे ठाकरे – आंबेडकरांच्या संयुक्त बैठकीनंतर मिळण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray – Prakash Ambedkar new Alliance or new entry in MVA?

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण