उद्धव ठाकरे यांना एकाकी पडून संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

प्रतिनिधी

मुंबई : संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांना राऊतांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने नेमलेल्या आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांसारखाच खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत लवकरच उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडून स्वतःच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपासारखी खळबळ उडवून दिली आहे. Uddhav Thackeray became lonely and Sanjay Raut soon joined the NCP

त्यासाठी राणे यांनी संजय राऊत यांच्या मूळच्या समाजवादी विचारांचा दाखला दिला आहे. संजय राऊत हे कधीच हिंदुत्ववादी नव्हते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. त्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. त्यामुळेच ते जय बजरंग बली या घोषणेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. आणि जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो त्याला फाटे फोडत आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप पक्षप्रवेश आणि शरद पवार यांच्या निवृत्तीची घोषणा या घटनांमुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं आहे. अशातच नितेश राणे थेट संजय राऊत यांच्या संदर्भात दावा केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे. संजय राऊत १० जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला, त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे संजय राऊत नंतर सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या रूपाने सापाला दूध पाजत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर त्यांचे खरे मनसुबे कळतील.

Uddhav Thackeray became lonely and Sanjay Raut soon joined the NCP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात