भाजपा नेते आशिष शेलार अन् विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमध्ये ‘ट्वीटर वॉर’!

मुंबईमधील रस्त्यांवरील खड्डे अन् बीएमसीच्या बँकेतील ठेवींवरून आरोप-प्रत्यारोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील वर्षानुवर्षे असणारे खड्डे यामुळे होणारे अपघात, पावसाळात मुंबईची होत असलेली तुंबई अन् मुंबई महापालिकेच्या बँकांमधील ठेवींच्या मुद्य्यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील  ट्वीटर वॉर समोर आला आहे. Twitter war between BJP leader Ashish Shelar and opposition leader Ambadas Danve

आशिष शेलार यांनी, ‘’  गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली. अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, 26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले, तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा…! आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! मुंबईकर हो! म्हणून आम्ही वारंवार सांगतोय लबाड लांडगा ढोंग करतोय मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय!!’’ असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंच्या विधानावर पलटवार केला  होता.

यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ‘’काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही..’’ असं म्हणत शेलारांना उत्तर दिलं होते.

अंबादास दानवेंच्या या टीकेला आशिष शेलारांनीही प्रत्युत्तर दिलं, ‘’अंबादास दानवे तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असल्याने मुंबईची थोडी कमी माहिती असू शकते म्हणून अधिकची माहिती देतो…

◆ आम्ही मुंबई महापालिकेत सत्ताधारी होतो, पण तुमच्या सारखे अहंकारी “सत्ताधीश” नव्हतो…आम्ही तेव्हा ही मुंबईकरांचे सेवक होतो आणि आजही आहोत

◆ तेव्हा पण आम्ही मुंबईकरांसाठी संघर्ष करीत होतो.. आणि आजही.

  • क्रॉफर्ड मार्केट बिल्डरच्या घशात घालण्याच्या विरोधात भाजपाने त्यावेळी संघर्ष केला
  • तुरटीचा घोटाळा आमच्या गोपाळभाई शेट्टी यांनी काढला
  • सॅप प्रणाली घोटाळा आम्ही उघड केला

असे बरेच विषय आहेत म्हणून तुमच्या नेत्यांना आम्ही सांगतो की, एकदा खुल्या चर्चेला या. पण ते अहंकार सोडायला तयार नाहीत. उरला प्रश्न मुंबई महापालिकेच्या बँक ठेवींचा…ते मुंबईकरांचे करातून जमा झालेले पैसे आहेत. मातोश्री 1 किंवा मातोश्री 2 मधून आलेले नाहीत. चांगल्या सेवा-सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबईकरांनी पालिकेला दिलेले आहेत. बँकाना व्याजावर पैसे कमवण्यासाठी दिलेले नाहीत! ‘’ असं शेलारांनी ट्वीटद्वार सांगितलं आहे.

Twitter war between BJP leader Ashish Shelar and opposition leader Ambadas Danve

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात