काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन मध्ये लतादीदींना श्रद्धांजली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी टिळक भवन येथे आदरांजली वाहण्यात आली. लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. Tribute to Latadidi at Tilak Bhavan

प्रांताध्यक्ष नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजन भोसले, मुनाफ हकीम, राजेश शर्मा, ब्रिजकिशोर दत्त, सचिव श्रीरंग बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नंतर पटोले यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रभु कुंज निवासस्थानी जाऊन मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले. लतादीदींच्या भगिनी उषा मंगेशकर, लता दीदींचे भाचे आदिनाथ ह्रदयनाथ मंगेशकर यांचे सांत्वन केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा शोकसंदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार त्यांच्यासोबत होते.

Tribute to Latadidi at Tilak Bhavan

महत्त्वाच्या बातम्या