वृत्तसंस्था
दिल्ली : गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० ट्रिप्स सोडणार आहे. सर्वप्रथम ७२ त्यानंतर आणखी ४० ट्रिप्स आणि आता ३८ फेऱ्या वाढविण्यात येत आहेत असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले. total of 150 trains now travel to Konkan for Ganpati Utsav
गणपति उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकून १५० फेऱ्या होणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केले आहे अश्या 72 फेऱ्या, त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता 38 फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या असून, अश्या एकून १५० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे.
कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवासाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे मंत्री दानवे यांनी सांगितले.
या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. कुठल्या ही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App