आर्यन खान प्रकरणासह 6 ड्रग्ज प्रकरणांचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची केंद्रीय टीम करणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 6 ड्रग्ज प्रकरणांचा तपास केंद्रीय टीम करणार आहे, अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी अशोक मुथा जैन यांनी दिली आहे.Total 6 cases of our zone will now be investigated by Delhi teams (of NCB)

मराठी माध्यमांनी या संदर्भात बातमी देताना आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून समीर वानखेडे यांना हटविण्याची मखलाशी केली आहे.

प्रत्यक्षात आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणासह एकूण 6 प्रकरणांचा तपास केंद्रीय टीम करणार असून त्याचे नेतृत्व संजय सिंग हे वरिष्ठ अधिकारी करणार आहेत. हा प्रशासकीय पातळीवरील निर्णय असून यामध्ये कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांचा काहीही संबंध नाही, असा खुलासा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने केला आहे. संजय सिंग यांची टीम उद्या मुंबईत पोहोचून सर्व प्रकरणांचा तपास आपल्या ताब्यात घेणार आहे.

त्याचबरोबर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनावश्यक कोणाचा हस्तक्षेप टाळण्याकडेही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा कटाक्ष आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मराठी माध्यमांनी मात्र याबाबत समीर वानखेडे यांना आर्यन खानची अटक भोवली, अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या आहेत.

Total 6 cases of our zone will now be investigated by Delhi teams (of NCB)

महत्त्वाच्या बातम्या