डीपी कट न करता थकीत शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करावं ; जयकुमार गोरे यांनी सरकारला केला सवाल


जे लोक वीज बिल भारतात त्यांना आम्ही संरक्षण देणार आहे अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.Tired farmers should be disconnected without DP; Jayakumar Gore questioned the government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.दरम्यान अधिवेशनात थकीत वीजबिले आणि कट केलेली लाईट कनेक्शन,या मुद्द्यावरून भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.यावेळी जयकुमार गोरे म्हणाले की , डीपी कट न करता थकीत शेतकऱ्यांचे हवं तर वीज कनेक्शन कट करा असं म्हंटल.



जयकुमार गोरे म्हणाले, एका डीपीवर २० वीज कनेक्शन असले आणि त्यातील १० जणांनी नाही भरलं तर सरकारकडून डीपी कट केला जात आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी लाईट बिल भरलं आहे त्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे डीपी कट न करता ज्यांनी लाईट बिल भरलं नाही त्यांचं कनेक्शन कट करावं असे जयकुमार गोरे यांनी म्हंटल.

यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर दिले की , शेतकऱ्यांना वीज पुरवठा करत असताना एका खांबा वरून अनेक कनेक्शन देण्यात येतात, त्यामुळे जे लोक बिल भरत नाहीत त्यांची दखल आम्ही घेतली आहे आणि जे लोक वीज बिल भारतात त्यांना आम्ही संरक्षण देणार आहे अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

Tired farmers should be disconnected without DP; Jayakumar Gore questioned the government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात