वर्षा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी : राज ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!

प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान “वर्षा” बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रबिंदूवर आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी भेट घेतली. त्यांच्याशी काही राजकीय आणि अराजकीय विषयांवर चर्चा केली आणि ते बाहेर पडत असतानाच काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचले. Three Congress leaders followed Raj Thackeray to meet the Chief Minister

राज ठाकरे यांनी मुंबईसह 16 महापालिका निवडणुकांच्या राजकीय पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली. पण त्याचवेळी काही आरोग्य विषयक प्रश्नांवर आणि पुणे महापालिकेने अचानक मिळकत कर वाढवून नागरिकांना नोटिसा दिल्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा माझी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि अमीन पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. शालेय पटाच्या वादा संदर्भात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

पण मुंबईतल्या राजकीय वर्तुळात आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा आहे, ती म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे. ज्यांच्या भाजप प्रवेशाची मध्यंतरी चर्चा रंगली होती, ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये जोरदार तयारी करत आहेत. त्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत का??, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात आहे.

शिवाय मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यांची खासदारकी जाऊन दोन टर्म उलटत आल्या आहेत. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्ष संघटनेबाबत काही सुधारणा सुचविणारी पत्रही लिहिली होती. मिलिंद देवरा हे काँग्रेस मधल्या नाराजीतूनच मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत का?? आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचण्याचा राजकीय मुहूर्त त्यांनी धरला आहे का?? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Three Congress leaders followed Raj Thackeray to meet the Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात