वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना आटोक्यात आल्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार अशीच चर्चा सुरु आहे. परंतु कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही, असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केले आहे. There is no mask removal until the corona is finished, Indicative statement of Deputy Chief Minister Ajit Pawar
अजित पवार म्हणाले की, मास्कमुक्तीबाबत मंत्रिमंडळात अशी काही चर्च झाली नाही. कोरोना जात नाही तोपर्यंत मास्क लावायचा, कॅबिनेट असते तेव्हा अशा चर्चा केल्या जातात. परंतु अशा चर्चा करु नका, जेव्हा मास्क काढायचा असेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू.
मुंबईतील विकासकामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, बऱ्याच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील सहकारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले होते की, मुंबईतील विकासकामांची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे विकासकामे पाहण्याची मला उत्सुकता होती. मग आम्ही ठरवले की वरळीपासून सुरुवात करायची आणि माहिमला दौरा संपवायचा. कोणाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही पाहणीची माहिती दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App