आर्यन खानने ड्रग्ज षडयंत्र रचल्याचे सकृतदर्शनी पुरावे नाहीत; मुंबई हायकोर्टाची टिपण्णी


वृत्तसंस्था

मुंबई : आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमे दम्याच्या यांनी कोणतेही ड्रग्ज षडयंत्र रचल्याचे सकृद्दर्शनी तरी पुरावे नाहीत.तसेच या प्रकरणात एनसीबीने ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेतला होता त्यावर आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, असे 28 ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.there is no conclusive evidence that Aryan Khan conspired for drugs; Comment of Mumbai High Court

आर्यन खान प्रकरणात जामीन देताना हायकोर्टाने दिलेल्या आदेशाची एएनआय वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे.आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, तर आर्यनकडे खरेदी – विक्री करण्याएवढे (कमर्शिअल क्वांटिटी) ड्रग्ज सापडले नाहीत.अरबाज खान आणि मुनमुनकडे सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचलेले दिसून येत नाही, अशी टिप्पणी 28 ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशात केली आहे.

याच व्हॉट्सअप चॅटच्या आधारे आर्यन खानची कोठडी वाढवण्यात आली होती. पण हे सर्व पुरावे पाहिले त्यावेळी आर्यनच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही किंवा त्यामध्ये कोणत्याही कटाचा भाग असल्याचे स्पष्ट होत नाही,असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.अरबाज मर्चंटकडे 5 ग्रॅम ड्रग्ज सापडले होते आणि एनसीबीने सांगितले होते की आर्यन खान हा त्याचा मित्र असल्याने तोही या ड्रग्जचे सेवन करणार होता.

there is no conclusive evidence that Aryan Khan conspired for drugs; Comment of Mumbai High Court

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय