कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही; तरी सुप्रिया सुळेंकडून दिशाभूलीचे ट्विट; दादा भुसेंचीही अजब मागणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव कोसळले. यासाठी कथित कांदा निर्यात बंदीला जबाबदार धरून विरोधी पक्षांनी दिशाभूल करायला सुरुवात केली असताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट खुलासा केला आहे.There is no central ban on onion exports; However, a misleading tweet from Supriya Sule; Dada husks are also in great demand

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने अजिबात बंदी घातलेली नाही. उलट जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत कांदा निर्यातीत अत्यंत सातत्य राहिले असून दर महिन्याला देशातून 40 मिलियन डॉलरचा कांदा निर्यात झाला आहे. याचा आपल्या अन्नदात्याला फायदाच झाला आहे. देश कांदा निर्यातीत सर्वोच्च स्थानावर राहिला आहे, असे पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील काही विरोधक दिशाभूल करणारी माहिती देणारी ट्विट करून जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे कांद्याच्या निर्यातीवर मूळातच बंदी नाही तरी देखील सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून शेतकऱ्यांची दिशाभूलच केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट असे :

या दोन्ही मंत्रालयांनी या परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घेऊन देशातील जादा कांदा जागतिक बाजारपेठेत पाठविल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळेल.

केवळ सुप्रिया सुळे यांच्या ट्विटमधून शेतकऱ्यांची दिशाभूल झाली असे नाही, तर शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी देखील अशीच दिशाभूल करणारी मागणी केली आहे. कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दादा भुसे यांनी दिले आहे. दादा भुसे हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. परंतु त्यांनाही केंद्राच्या निर्यात धोरणाविषयी पुरेशी माहिती नसल्याचे यातून स्पष्ट होते. कांदा निर्यातीत देश अव्वल राहिला असताना त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना झाला आहे. करण महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा निर्यातदार आहेत. पण हे सुप्रिया सुळे आणि दादा भुसे यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांच्या गावीही नसल्याचे या दोघांच्या सार्वजनिक वक्तव्यातून दिसून येते.

There is no central ban on onion exports; However, a misleading tweet from Supriya Sule; Dada husks are also in great demand

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात