महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी निवडणुकीत साेबत घेणे भाजपला परवडणारे नाही. भाजपचा वाढलेला जनाधार राज ठाकरेंना साेबत घेतले तर नाराज हाेईल. त्यांना भाजपने साेबत घेऊ नये कारण आरपीआय भाजपसाेबत आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी निवडणुकीत साेबत घेणे भाजपला परवडणारे नाही. भाजपचा वाढलेला जनाधार राज ठाकरेंना साेबत घेतले तर नाराज हाेईल. त्यांना भाजपने साेबत घेऊ नये कारण आरपीआय भाजपसाेबत आहे. जाेपर्यंत मी भाजपसाेबत आहे ताेपर्यंत राज ठाकरे भाजप साेबत निवडणुकीत येणार नाही. राज ठाकेरांना भगवी शाल पांघारुन भगवा रंग पाहिजे हाेता तर त्यांनी शिवसेना साेडयाला नव्हती पाहिजे. भगवा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. राज ठाकरे यांनी काेणत्याही धर्माच्या भावना दुखवू नयेत. राज ठाकरे यांची भाेंग्या बाबतची भूमिका चुकीची आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. There is don’t need of Maharashtra Navanirman Sena join the BJP in next election says centeral minister Ramdas Athavle
आठवले म्हणाले, औरंगाबाद मध्ये मुस्लिम समाज माेठया प्रमाणात आहे. राज ठाकरेंच्या बाेलण्यामुळे समाजात वाद निर्माण झाला तर धार्मिक तेढ निर्माण हाेऊ शकताे त्यामुळे त्यांच्या सभेला पाेलीसांनी परवानगी देऊ नये.मशिदीवरील भाेंगे हटविण्यापेक्षा मंदिरावर भाेंगे लावा अशी आमची भूमिका आहे. त्याकरिता तीन मे राेजी मशिदीवरील भाेंग्याचे संरक्षण आमचे कार्यकर्ते करतील. राज ठाकरे वाद निर्माण करण्यासाठी राज्यात फिरत असतील तर त्यांना विराेध केला गेला पाहिजे.
त्यांच्या सभा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट असून त्यांच्या सभांना गर्दी हाेत असली तरी त्यांना मते मिळत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ठाकरेंच्या भूमिके बाबत स्पष्ट भूमिका घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु हे सरकार दुबळे असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे एका पक्षाचे नेते असून त्यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांना पुरेशी सुरक्षा मिळणे आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले,दिल्लीत झालेली दंगल ही विशिष्ट समाजातील लाेकांनी नियाेजनपूर्वक केल्याचे दिसून येते. यात जे दाेषी आहे त्यांना चाैकशी करुन शिक्षा झाली पाहिजे. महागाई वरील लक्ष्य हटविण्यासाठी दंगल राजकीय पक्षाकडून घडविल्या जातात ही बाब म्हणणे याेग्य नाही. महागाई संपुष्टात आली पाहिजे याकरिता पंतप्रधान नरेंद्र माेदी प्रयत्न करत आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी ब्राम्हणांवर आक्षेप घेतला नाही तर ब्राम्हणयवादावर आक्षेप घेतला हाेता. ज्येष्ठ नेते शरद पवार जातीयवादी नाही परंतु त्यांच्या साेबतचे लाेक जातीयवादी आहे.
ते समाजात वाद निर्माण करतात त्याचा आम्ही निषेध व्यक्त करताे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमाेल मिटकरी यांचे ब्राम्हणाबाबत भूमिकेला आमचा विराेध आहे. शरद पवारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली त्याबाबत लाेकांना पकडण्यात आले. परंतु राणा दांम्पत्यांचे घराबाहेर शिवसैनिक घेराव घालत असतील त्यांच्यावर कारवाई पाेलीसांनी केली पाहिजे.
भाजप चिन्हावर लढलाे तरी आमचे स्वतंत्र अस्तित्व
रामदास आठवले म्हणाले,आगामी काळातील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर लढवावेत की आमच्या चिन्हावर याबाबत आम्ही निर्णय नंतर घेऊ. आमचे अस्तित्व संपण्याचा काेणता प्रश्न नाही. आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढून ही आम्ही आमचे अस्तित्व वेगळे ठेवले आहे. आम्ही भाजपच्या चिन्हावर लढलाे म्हणजाे काेणी आमचा कार्यकर्ता भाजप पक्षात जात नाही.
झाेपडपट्टीतील लाेकांचे पुर्नवसन व्हावे
सर्वाच्च न्यायालयाने सांगितले आहे की, रेल्वेच्या आजूबाजूच्या झाेपडपट्टी उठविण्यात याव्यात. न्यायालयाचा आदेश असल्याने अडचण आहे परंतु ४० ते ५० वर्षापासूनच्या झाेपडपट्टी मधील लाेकांचे पुर्नवसनाचा आराखडा राज्यसरकारने तयार केला पाहिजे. सन २०१९ पर्यंतच्या झाेपडपट्टीना संरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. राज्यभरातील रेल्वेच्या परिसरातील हजाराे झाेपडपट्टयातील लाेकांचे पुर्नवसन हाेण्याबाबत निर्णय राज्यसरकारने घेतला पाहिजे असे मत यावेळी आठवले यांनी मांडले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी मी केली आहे. कारण महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार वाढत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. परंतु केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करेल की नाही याबाबत मी साशंक आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. परंतु शिवसेना नेते संजय राऊत न्यायालयाचे निर्णयावर शंका व्यक्त करतात त्यापेक्षा त्यांनी विविध प्रकरणात चांगल्या प्रकारचे वकील नेमावे असे मत रामदास आठवलेंनी व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App