ठाकरे सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीवरून राज्यभरात वादविवाद सुरू आहेत. भाजपकडून होत असलेल्या टीकेवर महाविकास आघाडीचे नेतेही प्रत्युत्तर देत मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.There is a big difference between wine and liquor, said Balasaheb Thorat
प्रतिनिधी
अहमदनगर : ठाकरे सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीवरून राज्यभरात वादविवाद सुरू आहेत. भाजपकडून होत असलेल्या टीकेवर महाविकास आघाडीचे नेतेही प्रत्युत्तर देत मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
थोरात यांनी विरोधकांना मद्य आणि वाईन मधला फरक समजला नसल्याचा टोला लगावला आहे. नाशिक भागात द्राक्षाचे मोठे उत्पादन असून अनेक वायनरी आहेत. यातून शेतकऱ्यांना फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होत असते. विदेशात ज्या देशात दोन कोविड डोससह बूस्टर डोस झाला आहे अशा देशांत मास्क न वापरण्याला परवानगी आहे, मात्र आपल्याकडे अजून दोनही डोस अनेकांनी घेतली नाहीत असे सांगत एक प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीत याविषयावर चर्चा झाल्याचे ही बाळासाहेब थोरातांनी सूचित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App