महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज काहीना काही वाद , राज्यात लवकरच कधीही निवडणूक लागू शकते, दोन पक्षांचे संकेत -आशिष शेलार


पुढे आशिष शेलारांनी घणाघातही केला आहे. शेलार म्हणाले की महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे.The three parties in the Maha Vikas Aghadi have some disputes every day, elections may be held in the state anytime soon, hints of two parties: Ashish Shelar


विशेष प्रतिनिधी

मावळ : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळमधून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज काहीना काही वाद चालू असतो.त्यातील दोन पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात. या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, असं भाकितच आशिष शेलार यांनी केलंय.

पुढे आशिष शेलारांनी घणाघातही केला आहे. शेलार म्हणाले की महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केलाय.

पुढे शेलार म्हणाले की देशातील भाजपचे जे प्रमुख आहेत, ते सर्व एका बूथचे प्रमुख आहेत, भाजप कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत. असं करु नका. ते तुमच्या हिताचं नाही. जो बेकायदेशीर काम करत होता, ते गृहमंत्री असेल तरी आता वॉन्टेड आहेत. पोलीस अधिकारीही वॉन्टेड आहेत, असा इशाराही शेलार यांनी पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलाय.राज्य दलाल चालवत आहेत

सध्या राज्य दलाल चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत. गेल्या सात दिवसांपासून आपण पाहतोय की आयकर विभाग काय करतंय. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, असंही शेलारांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांवर गोळीबार

९ ऑगस्टला ३ शेतकरी गोळीबारात मारले गेले होते. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. ते गुन्हे देवेंद्र फडणवीसांनी मागे घेतले. पण ज्यांनी गोळ्या घातल्या त्या अधिकाऱ्यांना आता चांगली पोस्टिंग दिली गेली आहे. दोन वर्षे झाली तुम्हाला सत्ता मिळून. तुम्ही शेतकऱ्यांसाठी, मावळसाठी काय केलं? असा सवालच शेलार यांनी यावेळी विचारलाय.

‘काँग्रेस झोलबाज, शिवसेना दगाबाज’

हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. दगाबाजी जरी स्थापन झालं असलं तरी ते विकास करतील असं वाटलं होतं, असा टोला शेलार यांनी यावेळी लगावलाय.

The three parties in the Maha Vikas Aghadi have some disputes every day, elections may be held in the state anytime soon, hints of two parties: Ashish Shelar

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण