वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट आलेली असून मोठ्या शहरात ओमिक्रॉनची प्रकरणे अधिक आहेत, अशी माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर एन. के. अरोरा यांनी दिली. तसेच सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. The third wave of corona in the country; Warning to the head of the task force
देशात कोरोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचे सांगताना ते म्हणाले. नोव्हेंबर महिन्यात सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने संसर्ग होणाऱ्या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्ण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांतील आहेत. यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.
“जिनोम सिक्वेन्सनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या व्हायरसची नोंद झाली. गेल्या आठवड्यात देशात एकूण १२ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले असून ते आता २८ टक्क्यांवर पोचले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, कोलकाता आणि खासकरुन दिल्ली अशा मोठ्या शहरांत रुग्णसंख्या जास्त असून ७५ टक्क्यांहून अधिक आहे,” अशी माहिती डॉक्टर अरोरा यांनी दिली आहे. डॉक्टर अरोरा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे चेअरमन सुद्धा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App