तिसऱ्या लाटेला आता सुरुवात : राजेश टोपे; केंद्राच्या आढावा बैठकीनंतर जालन्यात स्पष्ट


विशेष प्रतिनिधी

जालना : तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही. पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील, असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. The third wave begins now

ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. आज राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे.असे आवाहन टोपे यांनी केले असून शाळा बंदच राहतील, असे म्हंटले आहे. 

राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांत वाढ झाल्यानेच निर्बंध लावले असून लोकांची काळजी घेणे गरजेचं आहे. जान है तो जहां है असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजेत. पण काळजी घेणंही महत्वाचं ,आहे असं टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तरं देत म्हटलं आहे.

ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याच्या सूचना

दरम्यान, आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती,सद्य उपलब्ध असलेली साधन सामुग्री याबाबत चर्चा झाली. ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली असून आता निधी खर्च करण्याला वेग येईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले.बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्याचं टोपे म्हणाले.

The third wave begins now

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती