प्रतिनिधी
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध करत काही लोकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक होऊन शिंदे – फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत, पण प्रत्यक्षात नाणार ऐवजी रिफायनरीसाठी बारसूची जागा ठाकरे – पवार सरकारनेच निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. The Thackeray-Pawar government chose Barsu instead of Nanar for the refinery
बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून (सोमवार) आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. बारसू नवे जालियनवाला बाग होऊ नये, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतली आहे.
प्रत्यक्षात नाणार ऐवजी रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरे यांनीच सुचवले होते. त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 जानेवारी 2022 रोजी पत्र लिहिले होते. बारसूमध्ये 13000 एकर जमीन राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याची तयारीही पत्रातून उद्धव ठाकरेंनी दर्शवली होती. तसेच, यातील बहुतांश जमीन ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते.
ठाकरे – पवार सरकारच्या सरकारच्या या पत्रानंतरच केंद्र सरकारने बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. सध्या हे पत्र सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहे. शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनीही हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे रिफायनरीच्या मुद्द्यावर भूमिका मांडणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. उद्धव ठाकरे, पवार यांनी एकापाठोपाठ एक पत्रकार परिषदांचा धडाका लावला होता. पत्रकार परिषदांमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली होती. पण सध्या बारसू रिफायनरीच्या संदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर केला जातोय, असा आरोप ठाकरे गट आणि अजित पवार करीत आहेत. परंतु, त्याचवेळी समोर आलेल्या पत्रामुळे शिंदे – फडणवीस सरकारने ठाकरे – पवारांना शह दिला आहे.
रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सुचवली होती. ठाकरेंनी पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं की, बारसूची जागा पूर्णपणे ओसाड आहे. त्या जागेवर कोणतंही पूनर्वसन करण्याची गरज नाही. त्यामुळे ती जागा रिफायनरीसाठी वापरता येणे शक्य आहे, असेही ठाकरेंनी पत्रात नमूद केले होते. सध्या हे पत्र सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बारसू विरोधात बोलणाऱ्या ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App