‘जलयुक्त शिवार’चे यश! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र देशात अव्वल

Fadnvis Jalyuktashivar

जाणून घ्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली प्रतिक्रिया?

 विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे.  यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘’जलयुक्त शिवार’चे यश! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र पहिला!! केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो.’’ अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. The success of Jalyukta Shivar The reaction of Devendra Fadnavis who is top in Maharashtra in water conservation

याचबरोबर  ‘’जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.’’

याशिवाय ‘’2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत. जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता असेच आपले सहकार्य जलयुक्त शिवार 2.0 मध्येही अपेक्षित आहे.’’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

The success of Jalyukta Shivar The reaction of Devendra Fadnavis who is top in Maharashtra in water conservation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात