Marathwada Rain:होत नव्हतं गेलं-मराठवाड्यावर आभाळ फाटलं ! मराठवाड्यात लाखो हेक्टर पीकं पाण्यात ; फडणवीसांची कळकळीची विनंती


  • अतिवृष्टीने मराठवाड्याचं प्रचंड नुकसान : पिके पाण्याखाली; शेतकऱ्यांना मोठा फटका
  • गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात पावसाने दाणादाण.
  • आज शेतकरी असो की, समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे’ : फडणवीस

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळत असून, याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि सीमेलगतच्या जिल्ह्यांना बसला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून, पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदत करण्याची कळकळीची विनंती केली आहे.the sky broke over Marathwada! In Marathwada Millions of hectares of crops in water; A heartfelt request from Fadnavis

अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय. लाखो हेक्टरवरील काढणीला आलेली पीकं पाण्याखाली गेलीत. शेतीला अक्षरश: तळ्याचं स्वरुप आलंय. शेतातील पाण्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. कधी नव्हे तो पाऊस बरसला, इतका बरसला की होत्याचं नव्हतं झालं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही’, असं सांगत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली.

‘अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना, या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे’, असा सल्ला फडणवीसांनी राज्य सरकारला दिला आहे.

the sky broke over Marathwada! In Marathwada Millions of hectares of crops in water; A heartfelt request from Fadnavis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण