विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण करायचं आहे, हे मगरीचे अश्रू आहेत – देवेंद्र फडणवीस

Fadnvis on Farmer

शेतकऱ्यांच्या बाजूने असते तर त्यांनी मागील काळात मदत केली असती. असंही फडणवीस म्हणाले आहेत.

प्रतिनिधी

राज्यात मागील दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळात केली. शिवाय, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणाबाजीही केली आणि यानंतर मदत तातडीने जाहीर करा अशी मागणी लावून धरत सभात्याग केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.The opposition party only wants to do politics on farmers issue Devendra Fadnavis

विधिमंडळात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 13,729 हेक्टरवर नुकसान आहे. आणखी अहवाल येत आहेत. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत देणार. माझी विरोधकांना विनंती आहे की, किमान शेतकऱ्यांच्या विषयावर तरी राजकारण करू नका.

याचबरोबर, ‘’अडीच वर्षे शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकटे येऊनही फुटकी कवडी न देणारे तेव्हाचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक हे आता फक्त गलिच्छ राजकारण करत आहेत. सरकार ने तातडीने दुसऱ्याच दिवशी पंचनामे सुरू करून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पावले उचलली आहेत.’’ असंही फडणवीस म्हणाले.


अभिमानास्पद! महिला वैमानिकांच्या बाबतीत भारत जगात अव्वल; एअर इंडियामध्ये सर्वाधिक संख्या


याशिवाय ‘’विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण करायचं आहे, हे मगरीचे अश्रू आहेत. त्यांनाही माहीत आहे, त्यांच्या काळातील अनुदानाचे पैसे आम्ही दिले. एवढं मोठं कोकणावर संकट आलं तेव्हा त्यांनी पैसे नाही दिले, आम्ही दिले आहेत. ७ हजार कोटी आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना दिले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार असं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात जाहीर केलं आहे. काल अवकाळी पाऊस झाला आम्ही आज तत्काळ पंचनामा करण्याचा आदेश दिला. विरोधकांना हे माहीत आहे की काल अवकाळी झाली की आज पैसे देता येत नाही. त्याचे पंचनामे करावे लागतात. तत्काळ पंचनामे करून त्याही शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे.’’ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

‘’नाफेडची कांदा खरेदी सुरू आहे हे त्यांना माहीत आहे. आकडे त्यांना दिले आहेत. पण केवळ या ठिकाणी राजकारण करण्याचं काम केलं जात आहे. हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. शेतकऱ्यांच्या बाजूने असते तर त्यांनी मागील काळात मदत केली असती. परंतु त्यांनी मदत केली नाही. त्यामुळे हे जे मगरीचे अश्रू काढणं सुरू आहे, मी त्यांना सांगतो की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्यसरकार मदत करेल. अवकाळाग्रस्त शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने आम्ही उभे राहू, मग यांनी कितीही राजकारण केलं तरी चालेल. शेतकऱ्यांना माहीत आहे मागील काळात त्यांच्या पाठीशी कोण उभा राहिले आहेत आणि आजही पाठीशी कोण आहे. त्यामुळे विरोधकांनी जो सभात्याग केला हे निव्वळ राजकारण आहे.’’ असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.

The opposition party only wants to do politics on farmers issue Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात