ठाकरे विरुद्ध शिंदे – फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये!!; पवारांची भूमिका सावध आणि संशयाची

प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. मुंबईतल्या वज्रमूठ सभेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. बारसू म्हणजे पाकिस्तान व्यक्त काश्मीर नव्हे. तिथे अनेक जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. आपण स्वतः 6 मे रोजी तिथे जाऊन बोलू, असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत जाहीर केले. The next issue in the Thackeray vs Shinde – Fadnavis government clash on May 6 in Barsu

आजच्या वज्रमूठ सभेपूर्वी शिंदे – फडणवीस सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बारसू प्रकल्पासंदर्भात वस्तुस्थिती सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तिथे फक्त माती परीक्षण सुरू आहे. त्या परीक्षणाचा निष्कर्ष आल्यानंतरच संबंधित कंपनी बारसू मध्ये रिफायनरी सुरू करायची किंवा नाही याचा निर्णय घेईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांची आणि राष्ट्रवादीची या प्रकल्पासंदर्भातली भूमिका सावध आणि काहीशी संशयाची आहे. पवार एकाच वेळी शिंदे – फडणवीस सरकारशी बोलत आहेत आणि बार्शी मधल्या आंदोलनातील त्यांनी लक्ष घातले आहे. आंदोलनकर्त्यांचे नेते सत्यजित चव्हाण यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली होती. त्यानंतर आज उदय सामंत देखील त्यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे शरद पवार यांची बारसू रिफायनरी प्रकल्प संदर्भातली भूमिका सावध आणि संशयाची असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र जाहीररीत्या प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन 6 मे रोजी जाण्याची घोषणा केल्याने उद्धव ठाकरे हे शिंदे – फडणवीस सरकारशी बारसू मध्ये स्वतंत्रपणे पंगा घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसून येते.

https://youtu.be/VtbD2V4OMzw

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना कोकणात येऊनच दाखवा असे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारून उद्धव ठाकरे बारसू मध्ये पोहोचत आहेत आणि त्यानंतर ते महाडच्या सभेला जाणार आहेत. त्यामुळे बारसू प्रकल्पाबाबत शरद पवार येत्या 5 दिवसांत नेमकी कोणती भूमिका घेणार??, ते उद्धव ठाकरेंचे मन वळविणार की एकीकडे शिंदे – फडणवीस सरकारशी बोलणी चालू ठेवून दुसरीकडे आंदोलनाला देखील फूस लावत राहणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंचा मात्र शिंदे – फडणवीस सरकारशी थेट संघर्ष करण्याचा आक्रमक पवित्रा कायम आहे.

The next issue in the Thackeray vs Shinde – Fadnavis government clash on May 6 in Barsu

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात