प्रतिनिधी
मुंबई : देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते खाली जमिनीवर वाद घालत बसले आणि तिकडे देहूचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याबरोबर हेलिकॉप्टर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकत्र घेऊन मुंबईत पोहोचले!!
The NCP argued that Ajit Pawar was not allowed to speak
पुणे-मुंबई प्रवासात सुमारे पाऊण तास हे तीनही नेते एकत्र हेलिकॉप्टरमध्ये होते. यावेळी त्यांच्यात नेमकी चर्चा काय झाली ते तिघांनी सांगितले नाही. परंतु, खाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अजितदादांना भाषण करू दिले नाही या विषयावरून वाद घालत बसले. शिळा मंदिर कार्यक्रमाच्या उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले त्यानंतर एकदम पंतप्रधानांचे नाव पुकारले गेले.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुण्यात दाखल झालेले आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचं लोहगाव विमानतळावर स्वागत केलं. pic.twitter.com/ZZTh894LSk
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 14, 2022
अजितदादांना पंतप्रधानांनी भाषण करण्याची सूचना केली. परंतु त्यांनी आपण भाषण करा असे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या मुद्यावरून खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते यांनी प्रोटॉकल तोडण्याचा उपस्थित केला. अजितदादांचे भाषण पंतप्रधान कार्यालयातूनच बाजूला करण्यात आले होते, असा दावा देहू संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
परंतु या सगळ्या घडामोडी घडत असताना खुद्द अजित पवार मात्र देवेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर हेलीकॉप्टर मधून मुंबईला पोहोचले होते. महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांमध्ये हेलिकॉप्टर मध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.
The NCP argued that Ajit Pawar was not allowed to speak
महत्वाच्या बातम्या