PAN-Aadhaar linking : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या अंतिम तारीख

Pancard and Aadhar card new

या मुदतीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. नवीन माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. The last date for linking of PAN Aadhaar extended has been extended to 30th June 2023

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. याबाबत पीआयबीने ट्विट केले आहे की, करदात्यांना काहीसा दिलासा देत आधारला पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ होती. पण जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ३ महिन्यांची मुदत दिली जात आहे. या मुदतीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

The last date for linking of PAN Aadhaar extended has been extended to 30th June 2023

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात