विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांचा महाविकास आघाडीत मिठाचा खडा, तर उद्धव ठाकरेंच्या तोंडी भाजपच्या विरोधात ऐक्याची भाषा!!, अशी राजकीय विसंगती शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आज दिसली. The language of anti-BJP unity in the mouth of Dhav Thackeray
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी वरळीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात सुरुवातीला संजय राऊत यांनी भाषण करताना महाविकास आघाडीत खडा पडेल याची पुरेपूर “राजकीय काळजी” घेतली. त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे टार्गेट 19 खासदार निवडून आणण्याचे जाहीर करून टाकले. आता शिवसेनेला महाविकास आघाडीत 19 खासदार निवडून आणण्यात जागा द्यायच्या, तर महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला लोकसभेच्या कितीशा जागा येतील??, असा सवाल तयार झाल्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी भाजप वर शरसंधान साधताना विरोधी पक्षांच्या ऐक्यची भाषा केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून वगळला या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसवर टीका केली. पण सावरकरांच्या त्यागा विषयी बोलताना सावरकरांनी तो त्याग मोदी – शहा आणि फडणवीसांसाठी केला होता का??, असा सवाल करून आपल्या भाजप विरोधाची धार कायम ठेवली. फडणवीसांची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी आहे. दिल्लीवरून आदेश आल्याने त्यांना ऐकावेच लागते. दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांविरोधात बोलण्याची हिंमत फडणवीस दाखवणार आहेत का??, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी बाकीचे जुनेच आरोप भाजपवर लावले.
नितीश कुमारांची पाटण्यात बैठक
येत्या 23 जून रोजी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे नितीश कुमार यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सामील होण्यासाठी पाटण्याला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यची भाषा केली. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीतले टार्गेट जाहीर करून महाविकास आघाडीत मात्र आदेश मिठाचा खडा टाकून ठेवला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे विरोधी ऐक्याचे भाषण संजय राऊत यांच्या भाषणाशी राजकीय दृष्ट्या परस्पर विरोधी ठरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App