The Kashmir Files : “मॉब लिंचींग”वर तारस्वरात बोलणारी “जमियत ए लिबरल” गप्प का??, जावेद अख्तर, अरुंधती रॉय, स्वरा भास्कर आहेत कुठे??

प्रतिनिधी

मुंबई : देशातल्या “मॉब लिंचींग”च्या घटनांवर तारस्वरात बोलणारी “जमियात ए लिबरल” अर्थात लिबरल जमात गप्प का…??, असा रोकडा सवाल “द कश्मीर फाइल्स” या सिनेमाच्या निमित्ताने सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे.The Kashmir Files: Why is “Jamiat-e-Liberal” silent while talking on “Mob lynching” ?? Where are Javed Akhtar, Arundhati Roy, Swara Bhaskar

एक दोन नव्हे, तर तब्बल 700 काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि 3 वर्षांच्या अभ्यासानंतर काश्मीरमधील हिंदूंची वस्तुस्थिती मांडणारा “द काश्मीर फाइल्स” हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.



मात्र “मॉब लिंचींग” सारख्या वेगवेगळ्या घटनांवर ट्विट करणारे जावेद अख्तर, रामचंद्र गुहा, स्वरा भास्कर, राणा आयुब, मुनव्वर राणा, अरुंधती रॉय, आनंद पटवर्धन यांच्यासारखे लिबरल्स काश्मिरी हिंदूंच्या वर झालेल्या अत्याचाराबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत, तर “द काश्मीर फाइल्स” या सिनेमाविषयी त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. उलट काही “विशिष्ट” थिएटर मालकांना उकसवून “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा थिएटर मधून उतरवण्याचे मनसुबे “जमियत ए लिबरल”ने रचल्याचे स्पष्ट होत आहे.

सत्यशोधनाचा सरकारी प्रयत्न नाही

मात्र कोणत्याही सरकारने या विषयावर समिती स्थापन करून सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. या विषयावर कुठेच प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसत नाही. रशिया-युक्रेन युद्धात लोकांवर झालेल्या अत्याचारांविषयी प्रसिद्धी माध्यमांनी जेवढी जागृती केली आहे, तसे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत?, असा प्रश्न दिल्ली विद्यापिठातील प्राध्यापिका तथा राजकीय विश्लेषक रेणुका धर बजाज यांनी उपस्थित केला. हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘द कश्मीर फाइल्स : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

काश्मिरी हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे

32 वर्षांपूर्वी भारतातील एका राज्यात हिंदूंबरोबर काय झाले, हे भारतीयांना अद्यापही माहिती नाही, हे धक्कादायक आहे. खरे तर गेल्या 32 वर्षांत भारतातील हिंदूंनी काश्मिरी हिंदूंसाठी काहीही केले नाही. आतातरी हिंदूंनी जागृत होऊन काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून दिला पाहिजे. या चित्रपटावर सर्वत्र चर्चा सुरू झाली पाहिजे, असे या विशेष संवादात बोलताना या चित्रपटातील अभिनेते प्रकाश बेलवाडी यांनी म्हटले आहे.

हा दुप्पट नरसंहार

यावेळी ‘जम्मू इक्कजुट्ट’ या संघटनेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता अंकुर शर्मा म्हणाले की, वर्ष 1947 पासून भारतात हिंदूंचा नरसंहार झाला. हे सर्व सरकारांनी, प्रसिद्धीमाध्यमांनी, प्रशासकीय अधिका-यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. काश्मीरमधील नरसंहारावर ‘विशेष तपास पथक’ स्थापन करून चौकशी करण्याची काश्मिरी हिंदूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, हेच नाकारले जात असेल, तर काश्मिरी हिंदूंना न्याय कसा मिळणार? हा नरसंहार नाकारणे, हे दुप्पट नरसंहार करण्यासारखे आहे.

हे मोठे षडयंत्र

यावेळी सनातन संस्थेच्या क्षिप्रा जुवेकर म्हणाल्या की, काश्मिरी हिंदूंचा नरसंहार हा एका दिवसात अचानकपणे झालेला नाही. हे षडयंत्र फार आधीपासून चालू होते, त्यासाठी पैसा पुरवण्यात आला. हिंदूंच्या याद्या करून त्या सर्वत्र वाटण्यात आल्या. ‘हमे कश्मीर चाहिए, हिंदू नही!’, अशी प्रसिद्धीपत्रके काढण्यात आली.

याकडे तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. मोहन गौडा म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने देशभरात 500 चित्रप्रदर्शने लावून, तसेच अनेक सभा घेऊन 10 लाख हिंदूंना जागृत केले आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत समिती हा लढा चालूच ठेवेल.

The Kashmir Files: Why is “Jamiat-e-Liberal” silent while talking on “Mob lynching” ?? Where are Javed Akhtar, Arundhati Roy, Swara Bhaskar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात