पवार – ठाकरे सरकारचे “पाशवी चेहरे” जनता विसरणार नाही; विजया रहाटकर यांचे टीकास्त्र


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आधी पालघरच्या साधूंचे मॉब लिंचींग ते आजची अर्णब गोस्वामी यांची अटक पवार – ठाकरे सरकारचे पाशवी चेहरे जनता विसरू शकणार नाही. जनतेने ते विसरता कामा नयेत, असे परखड टीकास्त्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी सोडले आहे.

पवार – ठाकरे सरकारच्या कालावधीतील सरकारी अत्याचाराच्या घटनांचे फोटो त्यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. पालघरमध्ये घडलेले साधूंचे मॉब लिंचींग त्यावर पवार – ठाकरे सरकारची ढिलाईची कारवाई, त्यानंतर एका व्यंगचित्रावरून निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेली बेछुट मारणार. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्यातही कुचराई केली.

तसेच सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ट्विट करणारा समीत ठक्कर याला दोनदा अटक आणि एखाद्या दहशतवाद्यासारखे बुरखा घालून मुसक्या आवळून त्याला न्यायालयात सादर करणारे पोलीस आणि आता रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांचे अटक या सगळ्या सरकारी अत्याचाराचे फोटो ट्विट करून रहाटकर यांनी पवार – ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे – पवार सरकारचे हे पाशवी चेहरे कोणी विसरू शकणार नाही. कोणी विसरू नयेत, अशा आशयाचे ट्विट रहाटकर यांनी केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती