धर्मांध औरंगजेबाची पापे उघड्यावर आणि महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त त्याच्या कबरीवर!! अशी अवस्था आज आली आहे की नाही??, हो तर खरेच आज अशी अवस्था आली आहे. The fanatic Aurangzeb’s sins exposed; Police cover his grave in Maharashtra!
तिकडे काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणाचा पहिला रिपोर्ट कोर्टात सादर झाला आहे. त्यामध्ये मशिदीच्या परिसरातील सर्व हिंदू मंदिरांच्या खुणांचा स्पष्ट आणि ठळक उल्लेख आहे आणि दुसरीकडे संभाजीनगरात औरंगजेबाच्या कबरीवर पोलिस बंदोबस्त लावला आहे. तेथे कोणी घुसून औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावता कामा नये यासाठी भारतीय पुरातत्व खात्याने तेथे यायला बंदी घातली आहे.
– अजयकुमार मिश्रा यांचा रिपोर्ट
कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांनी पहिल्या रिपोर्टमध्ये ज्ञानवापी मशीद परिसरात आढळलेल्या हिंदू मंदिराच्या खुणांचे वर्णन आपल्या रिपोर्टमध्ये केले आहे. उत्तर – पश्चिम भिंतीवर कमळ, शेषनाग, विविध देवतांच्या मूर्ती यांच्याकडून आढळल्या आहेत. 4 दैवतांच्या मूर्तींवर शेंदूर लेपन आहे. भिंतीच्या परिसरात हिंदू मंदिरांचे खांब, पथ्थर, त्यावरील कोरीव काम त्याचा प्रचंड मोठा ढीग आहे. तो उपसण्याची गरज अजय मिश्रा यांनी रिपोर्टमध्ये व्यक्त केली आहे. याबाबतचा निर्णय जरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाराणसी कोर्ट आज देणार नसले तरी अजयकुमार मिश्रा यांच्या रिपोर्ट मधल्या बाहेर आलेल्या बाबी तिथल्या हिंदू मंदिराच्या अस्तित्वाच्या ठळक खुणाच सांगत आहे!!
दुसरे कोर्ट कमिशनर विशाल कुमार सिंह यांचा मशिद परिसराच्या आतल्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट सादर झाला आहे. याचाही निकाल उद्या दुपारी 3.00 नंतर येणार आहे.
हे सर्व घडत असताना म्हणजे औरंगजेबाची ही पापे उघड्यावर येत असताना औरंगजेबाच्या संभाजीनगरातल्या कबरीला कुठेही धक्का लागू नये याची भीती महाराष्ट्राच्या पोलिस प्रशासनाला का वाटावी?? तेथे बंदोबस्त का ठेवला आहे?? त्या परिसरात जायला बंदी का घातली आहे??, या प्रश्नांची उत्तरे उघड आहेत!!
– मुस्लिम पक्षाचा नवा डाव
दुसरीकडे सुप्रीम कोर्टात मुस्लिम पक्षाने बाकीच्या मशिदी देखील सील करण्याचा अर्ज दाखल केला आहे. जर ज्ञानवापी मशिदीतील विशिष्ट परिसर सील होऊ शकतो, तर बाकीच्या मशिदीही सील केल्या पाहिजेत, अशी भूमिका आता मुस्लिम पक्षाने घेतली आहे.
मथुरेच्या शाही ईदगाह परिसराचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण होता कामा नये, असा तो अर्ज आहे. मथुरेतील शाही ईदगाह परिसरातील व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्याची मागणी हिंदू पक्षाने केली आहे. त्याला विरोध करणारा हा अर्ज आहे. जर मशिदी सील केल्या तर तिथल्या हिंदू मंदिरांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न होईल हा मुस्लिम पक्षाचा डाव आहे, असा हिंदू पक्षाचा दावा आहे. आता या अर्जावर देखील उद्याच सुप्रीम कोर्ट निर्णय देणे अपेक्षित आहे.
– हिंदूंची भळभळती जखम हेच औरंगजेबाचे पाप
म्हणजे ज्ञानवापी मशिदीचे जेव्हा व्हिडीओग्राफी सर्वेक्षण झाले तेव्हा औरंगजेबाची पापे बाहेर आली. ज्याने हिंदूंची अस्मिता चिरडण्यासाठी आणि मुस्लिमांच्या विजयाच्या खुणा सर्व जगाला दिसण्यासाठी मुद्दाम अर्धवट मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारल्या. हिंदूंची भळभळती जखम तशीच कायम वाहत राहावी याची “राजकीय व्यवस्था” करून ठेवली, तर दुसरीकडे मुस्लिम पक्ष बाकीच्या मशिदींचे सर्वेक्षण रोखण्याचा प्रयत्न करून औरंगजेबाची पापे झाकण्याचा प्रयत्न करत नाही ना!!, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. किंबहुना मुस्लीम पक्षाच्या अर्जात असली हीच खरी मेख आहे. यावर सुप्रीम कोर्टात उद्या निर्णय घेणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App