पुढे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्याला मयत घोषित केले.The death of an ST carrier in Aurangabad has caused a stir among the employees
विशेष प्रतिनिधी
नाशिक : औरंगाबाद मार्गावरील एसटी बसच्या वाहकाचा मृत्यू झाला आहे.नाशिक औरंगाबाद या मार्गावरील खासगी शिवशाही (एम.एच. १८, बी.जी. १४८७) बस सायंकाळी ५.३० च्या सुमारास औरंगाबाद बसस्थानकात पोहचली.दरम्यान ही बस औरंगाबाद येथे मुक्कामी होती.तसेच ड्युटी पूर्ण झाल्यानंतर चालक आपल्या घरी निघून गेला.पण नाशिक येथील वाहक गाडीतच आराम करत होता.
दरम्यान रात्री रात्री १०.३० च्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना गाडीचा दरवाजा उघडा दिसला.दरम्यान त्यांनी गाडीत डोकावले असता वाहक झोपलेला दिसला.या कर्मचाऱ्यांनी त्याला उठावण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहिच प्रतिसाद दिला नाही.पुढे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्याला मयत घोषित केले.
बाकी कर्मचाऱ्यांनी आरोप केला की ,’त्या वाहकाला जबरदस्तीने ड्युटीवर पाठवले होते,असा आरोप बाकी कर्मचाऱ्यांनी केला आहे.दरम्यान या बाबत आगार व्यवस्थापकांशी दोन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App