डोकी नसलेल्या भुतांचा संचार आणि थरारही; जळगावच्या ‘ब्लड’ची बातच अशी न्यारी

विशेष प्रतिनिधी

जळगाव : डोकी नसलेली भुते जळगावात वावरत आहेत, असे सांगितले तर कुणाचीही गाळण उडेल. असाच एक व्हिडिओ काही तरुणांनी तयार करून फत्तेपुर देऊळगाव परिसरात थरकाप उडवून दिला. The communication and trembling of headless demons; This is the story of Jalgaon’s ‘Blood’

जळगावची तर बातच न्यारी. तेथील ‘ब्लड’मध्ये काही भयानक आणि खतरनाक करण्याची हौस असते. पण, आपल्या बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर समाजाच्या हितासाठी करण्याऐवजी समाजात घबराट निर्माण करण्यासाठी तरुणांनी केला.

एखाद्या भयपटाला शोभेल, असा डोके विरहित धडाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तिघांना फत्तेपुर पोलिसांनी जेरबंद केले. शिर नसलेला एक मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत असलेला एक व्हिडिओ बुधवारी रात्री काही तरुणांनी चारचाकी वाहनांच्या प्रकाशात तयार केला. फत्तेपूर तोरणळ्या या दरम्यान असलेल्या पटाळ फाट्यावर भूत फिरत असल्याचा मजकूर टाकून गुरुवारी तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला, त्यामुळे फत्तेपूर तोरणाळा, देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत जामनेर तालुक्यात चर्चा पसरली.

याबाबत फत्तेपुर येथील काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांच्या कानी ही बाब घातली. त्यावरून फत्तेपूर औट पोस्टच्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन रात्री ठाण्यात तपासणीसाठी हजर केले. त्यात व्हिडिओ बनावट असल्याचे उघड झाले.तरुणावर पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • डोकी नसलेल्या भुतांचा संचार आणि थरारही
  • व्हिडीओ व्हायरल करणारे तिघे जेरबंद
  • डोकी नसलेली दोन भुते उलटी चालतात
  • एखाद्या भयपटाला शोभेल असा व्हिडीओ बनविला
  • फत्तेपुर देऊळगाव परिसरात उडाला थरकाप

The communication and trembling of headless demons; This is the story of Jalgaon’s ‘Blood’

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात