राज्यसभा “अपक्ष” : संभाजीराजेंचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची शाहू महाराजांशी मात्र फोनवरून चर्चा!!


प्रतिनिधी

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराची करू इच्छिणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पिताश्री कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वतः ही माहिती दिली. The Chief Minister who did not take Sambhaji Raje’s phone, however, had a phone conversation with Shahu Maharaj

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शाहू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते न्यू पॅलेस येथे आले होते. शाहू महाराज यांच्याशी सदिच्छा भेट घेऊन त्यांनी शिवसेनेच्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी आशीर्वाद घेतले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर मी शाहू महाराजांना येऊन भेटलो. शाहू महाराजांचे आणि ठाकरे कुटुंबियांचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे येथे येऊन गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांशी फोनवरून राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली, अशी माहिती संजय राऊत यांनी शाहू महाराजांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली.



– मुख्यमंत्र्यांनी फोन घेतला नाही : संभाजीराजे

मुख्यमंत्र्यांनी माझ्या अपक्ष उमेदवारीसाठी आधी शब्द दिला होता. पण नंतर तो शब्द फिरवला, असा आरोप संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. संजय पवार यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून फोन केला होता. परंतु त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या फोन न घेणे या मुद्द्यावरून देखील महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून बराच राजकीय गदारोळ झाला आहे. मात्र आता संभाजीराजे यांचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज शाहू महाराजांशी फोनवरून चर्चा केली. ही माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिली. या फोन पे चर्चा राजकीय नाट्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व आहे.

The Chief Minister who did not take Sambhaji Raje’s phone, however, had a phone conversation with Shahu Maharaj

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात