कसब्याची पोटनिवडणूक ही लढाई विचारांची; चुकीला योग्य शासन करण्याची!!

कसबा पोटनिवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीच्या अखेरच्या दिवशी सोशल मीडियावर देखील मोठे घमासान सुरू आहे. ही लढाई केवळ दोन उमेदवारांमधली उरली नसून दोन विचारसरणी मधली लढाई बनली आहे. चुकीला योग्य शासन करण्याची ही संधी आहे. The by-election of the town is a battle of ideas


गिरीश भाऊ बापट यांच्या नंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तितक्याच कार्यक्षम व लोकप्रिय आमदार म्हणजे स्वर्गीय मुक्ताताई टिळक. मुक्ताताईंच्या अकाली निधनानंतर कसब्याची पोटनिवडणूक लागली. इतर कुठल्याही ठिकाणी असते तशीच ही नेहमीची प्रक्रिया. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना,आरपीआय युती व मनसेच्या पाठिंब्यावर श्री. हेमंत रासने उभे आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट,संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष यांच्या महाविकास आघाडीतर्फे श्री. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. हे दोन्ही उमेदवार ‘नगरसेवक’ म्हणून कसब्यातील मतदारांना दीर्घकाळापासून परिचित आहेत. हे उमेदवार देखील आपल्या सारखीच माणसं असल्याने त्यांच्यात काही चांगल्या काही वाईट बाजू असू शकतील व त्या चांगल्या वाईट बाजूंचे कौतुक अथवा टीका होणे नैसर्गिक आहे. या मतदारसंघात मतदारांनी कोणाला निवडून द्यायचे याचा निर्णय ते २६ तारखेला घेणार आहेत.

परंतु …. होय … परंतु हा शब्द वापरावा लागतोय कारण श्री रवींद्र धंगेकर हे ज्या विचारसरणीचे प्रतिनिधी म्हणून उभे आहेत त्या पक्षांच्या विचारसरणीवर कसब्यातील मतदारांनी विचार केला पाहिजे हे आवर्जून सांगावे वाटते.

आज जे पुणे शहर दिसत आहे त्याचे मूळ म्हणजे कसबा परिसर, पुणे शहराला पुणे हे नाव ज्यामुळे मिळाले तो पुण्येश्वर देखील याच परिसरात. असा हा कसबा मतदारसंघ म्हणजे कसबा गणपती, ओंकारेश्वर, दगडूशेठ हलवाई,शारदा गणपती, पासोड्या विठोबा, तांबडी जोगेश्वरी, शनीचा पार (नावं तरी किती घ्यावीत) अशा दैवतांनी व महाराष्ट्राच्या-हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या शनिवार वाडा, लाल महाल,केसरीवाडा सारख्या वास्तूंनी अगदी शिगोशिग भरून गेलेला आहे. या परिसरात कोण कोण वावरून गेले याची यादी करायची म्हटली तर अगदी तुकोबाराय, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, दादोजी कोंडदेव, श्रीमंत बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी, ज्योतीबा व सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे अशी कितीतरी नावं घेतली तरी संपायची नाहीत. थोडक्यात सांगायचे म्हटले तर राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्वच पातळ्यांवर या मतदारसंघाने महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर ठसा उमटवला आहे.

अशा या मतदारसंघात मराठा, ब्राह्मण, धनगर, वंजारी, कुंभार,मातंग असे अनेकविध जाती व मारवाडी-गुजराती-कानडी-बिहारी असे अनेक प्रांतीय समाज पुरातन काळापासून वसलेले आहेत. या अनेकविध लोकांना एकत्र आणून शिवाजी महाराजांपासून ते अगदी लोकमान्य टिळकांपर्यंतच्या महापुरुषांनी राष्ट्रीय चळवळी उभ्या केल्या. या बारा बलुतेदार, अलुतेदारांची वज्रमुठ हीच कसब्याची पुरातन ओळख आहे.

परंतु गेल्या काही वर्षांपासून एकत्र असलेला हा मराठी समाज आपण जातीवरून, ऐतिहासिक पुरुषांवरून,वास्तूंवरून, पुस्तकांवरून भांडणात गुंतलेला पाहत आहोत की नाही ते आठवा. आठवलं ? हे सगळे वादविवाद एका दिवसांत निर्माण झाले का हो ? कोण गुजराती आहे, कोण मारवाडी आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण काय खातो, कोण काय पूजतो यावरून आपापसांत कोर्टकचेरी, अपमान, हाणामारी हे सगळं आपण यापूर्वी कधी अनुभवले होते का हो ? तर याचे उत्तर आहे ….. नाही. हे सगळं अचानक नाही तर अगदी सुनियोजित पद्धतीने घडवलं गेलं आहे.

स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीने (होय, काँग्रेस आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसने) जाणूनबुजून तेढ निर्माण करणाऱ्या काही संघटना महाराष्ट्रात निर्माण केल्या, त्यासोबतच काही समाजकंटकांना राजकीय पाठींबा व प्रतिष्ठा दिली. याचू ओझरती उदाहरणे पहायची म्हटलं तर

पाकिस्तानशी संबंध व चीन पुरस्कृत माओवादी असलेल्या अरुण फरेरा, व्हर्नन गोंन्सलवीस, गौतम नवलाखा, वरावरा राव यांच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडने उडी मारली, याच आव्हाडने इशरत जहां नामक अतिरेकी महिलेच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करण्याचा निलाजरेपणा याआधी केलाच होता.

याच पक्षाच्या अमोल मिटकरी नामक गरळओकू बहाद्दराने शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७ टक्के मुसलमान होते असा प्रचार चालवून वेळोवेळी संभाजी महाराज, शिवाजी महाराज, हिंदू धर्म यांच्या नावाखाली वाट्टेल ते विष ओकण्याचा सपाटा लावला आहे.

याच लोकांनी पाठींबा व प्रतिष्ठा दिलेल्या संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडने ‘मराठा समाजाचा शेवटचा थांबा बौद्ध धर्म आहे’ असे सांगत वामन मेश्राम नामक सर्पाच्या मदतीने त्यांचे धर्मांतरण घडवण्याची विचारप्रक्रिया गेली काही वर्षे सुरू केली आहे. याची संभाजी ब्रिगेड गणपतीबद्दल काय विचार मत मांडते हे कसब्यातील गणेश भक्त विसरले काय?

याच लोकांनी पाठींबा दिलेल्या खेडेकर, कोकाटे सारख्या नालायकांनी ‘ब्राह्मण स्त्रियांवर बलात्कार केले पाहिजेत’ तसेच ‘शिवाजी महाराजांचा खून ब्राह्मण मंत्र्यांनी केला’ असे अनेक बिनबुडाचे दावे आपल्या गचाळ लेखणी व वाणीने केले आहेत.



रवींद्र धंगेकरांसाठी प्रचाराला आलेल्या सुषमा अंधारे नामक विकृत स्त्रीने सर्व हिंदूंना वंदनीय असलेल्या ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत मंडळी व हिंदू देवी देवतांची सांगता येत नाही इतक्या खालच्या पातळीवरील टिंगलटवाळी केली आहे.

आणि ही बांडगुळ ज्या झाडावर वाढली, पोसली आहेत ते राहुल गांधी- शरद पवार नामक तथाकथित नेते तरी कुठं कमी आहे ? मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणारा हा बनावट मराठा नेता ‘मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे’ म्हणून मात्र तळमळतो. ‘शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही’ म्हणणारा हा तथाकथित साहेब स्वतःला मात्र ‘जाणता राजा’ म्हणवून घेताना शरमत नाही. सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारणाऱ्या या माणसाला ब्राह्मण समाज, बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयीचा द्वेषभाव तर अगदी बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर देखील टाकता आला नाही.

बनावट स्टॅम्प प्रकरणात तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ, दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला नवाब मलिक, खंडणीखोर अनिल देशमुख यांना मंत्री बनवताना काँग्रेस राष्ट्रवादीला लाज शरम वाटत नाही. मुलगा व्हावा म्हणून सुनेचा छळ केल्याचा आरोप असलेल्या महिलेलाच महिला प्रदेशाध्यक्ष व बलात्काराचा आरोप झालेल्या तरुणालाच युवा प्रदेशाध्यक्ष बनवताना यांचे हात थरथरत नाहीत. असो…यांच्या गुन्ह्यांची यादी न संपणारी आहे.

कसबा मतदारसंघातील मतदारांनो, आताच्या क्षणापर्यंत लाईट, ड्रेनेज, पाणी, रस्ते आणि तत्सम विषयावरून तुम्ही आपापली मते बनवली असतील. या निवडणुकीचा जो काही निकाल लागेल त्या निकालामुळे राज्यात असलेल्या शिवसेना-भाजपच्या सत्तेत फार काही मोठा बदल घडणार आहे असेही नाही परंतु …..

परंतु आजच शरद पवारांनी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी भाषण करताना मुसलमान लोकांपुढे काय वक्तव्य केले ते ऐकलेत का ? याच मुस्लिम मतदारांपुढे बोलताना पुण्याचा माजी महापौर काय म्हटला ते ऐकलेत का ? याच मतदारसंघात झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाचा नेता मुसलमानांना आवाहन करताना काय म्हटला ते ऐकलेत का?

येत्या २६ तारखेला राम मंदिर, सर्जिकल स्ट्राईक, जम्मू काश्मीरची ३७०मधून मुक्तता, कोविड काळात घरोघर मोफत पोहचवलेलं अन्नधान्य इथपासून ते अफझलखानाचे थडगे उखडून काढणाऱ्या नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना पराभूत करण्यासाठी अगदी मेलेल्या मुसलमानांना देखील बोलावणाऱ्या विचारसरणीला आपण पाठींबा देणार आहोत काय?

भवानी देवी, गणपती फोडून टाका म्हणणाऱ्या, पुण्येश्वराला गाडून त्यावर मशीद निर्माण करणाऱ्या, ज्ञानोबा तुकोबांवर अश्लील टीका करणाऱ्या, राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी हिंदू पोरींना हिजाब घालणाऱ्या, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू पोरींचे मुसलमान तरुणांशी लग्न लावून देणाऱ्या, शिवाजी महाराजांवर अश्लाघ्य लिहीणाऱ्या समाजकंटकांना पुरस्कार देणाऱ्या कुलघातक्यांच्या विचारांचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उभ्या असलेल्या रवींद्र धंगेकरांना आपले मत देणे योग्य आहे का? कसब्याचा आमदार विधानसभेत लव्ह जिहाद कायद्याच्या बाजूने मतदान करणारा असावा की पवार साहेबांनी सांगितले म्हणून त्या कायद्याच्या विरोधात मतदान करणारा असावा? कसब्याचा आमदार गणपतीचे दर्शन घेणारा असावा की चतुर्थीच्या दिवशी मटण खाल्ले म्हणून दर्शन नाकारणारा असावा? कसब्याचा आमदार प्रभूला श्रीरामाला गोणपाटात ठेवून अफझलखानाच्या कबरीला एसीमध्ये ठेवणाऱ्या पिलावळीचा असावा की प्रभू रामाचे भव्य मंदिर निर्माण करून अफझलखानाची कबर उखडून काढणारा असावा?

ही लढाई आता रासने विरुद्ध धंगेकर अशी उरलेली नाही तर ही आता दोन विचारांची लढाई झाली आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर एक कार्यकर्ता म्हणून कुणासाठी चांगले असतीलही; परंतु त्यांनी त्यांची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जी विचारसरणी-जो पक्ष निवडला तो मात्र साफ चूक आहे. आणि चुकीचा पक्ष निवडणारा कर्ण, पितामह भीष्म हे आपले नातेवाईक असले तरी त्यांना योग्य शासन करण्याची शिकवण भगवद्गीता आपल्याला देते.

(सौजन्य : फेसबुक)

The by-election of the town is a battle of ideas

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात