कोरोनाविरुध्दच्या लढाईत अभिनेता बनला अ‍ॅम्ब्युलन्स चालक


कन्नड अभिनेता अर्जुन गौडा याने कोरोनाविरुध्दच्या लढाईत आगळा-वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक बनून अर्जून सध्या कोरोना रुग्णांची मदत करत आहे.The ambulance driver became an actor in the battle against Corona


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कन्नड अभिनेता अर्जुन गौडा याने कोरोनाविरुध्दच्या लढाईत आगळा-वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक बनून अर्जून सध्या कोरोना रुग्णांची मदत करत आहे.

युवराथना आणि रुस्तम या चित्रपटात अर्जूनने काम केले होते. प्रोजेक्ट स्माईल ट्रस्ट अंतर्गत गरजूंना मदत करण्याचा उपक्रम त्याने सुरू केला आहे.



लोकांना रुग्णालयात नेणे तसेच कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जात असल्याचेही अर्जुनने सांगितले आहे.

अर्जुन म्हणाला की, ज्या लोकांना रूग्णालयात जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी गाडीची आवश्यकता असते त्यांना रुग्णवाहिका सेवेसाठी मदत केली जाते. अर्जुन म्हणाला की, मी बरेच दिवस रस्त्यावर आहे आणि जवळपास 6 लोकांवर अंत्यसंस्कार देखील केले आहेत.

आम्ही याची काळजी घेत आहोत की आम्ही कुठे ही असो किंवा कुठल्याही धमार्ची गरजू व्यक्ती असो. त्यांना मदत करतो. मी शहरभर कुठेही जायला तयार आहे. अलीकडेच मी एका गरजू व्यक्तीला केंगेरीपासून खूप दूर असलेल्या व्हाइटफिल्ड हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.

पुढील काही महिने मी गरजुंना मदत करणे चालूच ठेवणार आहे, कारण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ज्यांना ऑक्सिजन आवश्यक आहे त्यांना ऑक्सिजन देत आहोत.

The ambulance driver became an actor in the battle against Corona

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात