24 वर्षांच्या अनुभवी ड्रायव्हरची ‘एसटी’ 8 प्रवाशांसह वाहून गेली


गुलाब चक्री वादळामुळे विदर्भ-मराठवाडा, खानदेश येथे गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस चालू आहे. यामुळे नदी-नाले, ओढ़े ओसंडून वाहात आहेत. अशीच एक एसटी वाहून गेल्याने ड्रायव्हरसह आठ प्रवासी वाहून गेले आहेत.The 24-year-old driver’s ‘ST’ was carried with 8 passengers


प्रतिनिधी

नागपूर : नांदेडवरून नागपूरकडे येणारी एसटी बस उमरखेड समोरील पुलावरून वाहून गेली. या बसमध्ये नांदेडवरून बसलेल्या आठ प्रवाशांची नोंद एसटी महामंडळाच्या जीपीएस प्रणालीवर झाली आहे. या बसमध्ये उमरखेड वरुन किती प्रवासी बसले किंवा नाही याची नोंद नाही.

एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केले. तीन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी एक मृत्यू पावला. तर केबिनमध्ये पुन्हा 3 जण मृतावस्थेत दिसत असल्याची माहिती आहे. बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.



नागपूरचे एसटी विभाग नियंत्रक नरेंद्र बेलसरे यांनी सांगितल्यानुसार ही बस घाटरोड डेपोची आहे. वाहन चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर (56) हे सेवेत होते. सोमवारी रात्री 10 वाजता प्रवासी घेऊन हे दोघेही नांदेडला गेले. नांदेडला रात्री 1 वाजता ही पोहोचली. मंगळवारी सकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी ही बस नांदेडवरून निघाली.

तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणाली नुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते. त्यातील 4 हदगाव व 4 प्रवासी दिग्रसला उतरणार होते. उमरखेडवरून ही बस सकाळी साडेसातला दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे गाव उमरखेडपासून अवघ्या काही मिनिटांवर असल्याने किती प्रवाशांचे बुकिंग झाले हे कळू शकले नाही. एसटीचे चालक सतीश सुरेवार यांना एसटी बस चालवण्याचा 24 वर्षांचा अनुभव आहे.

ते 1997 मध्ये एसटी महामंडळात रुजू झाले. यापूर्वी त्यांच्याकडून एकही अपघात झालेला नाही. गेली 15 वर्षे ते नागपूर-नांदेड या मार्गावरुन एसटी बस चालवत आहेत. काल रात्री पहाटे याच मार्गावरून ते बस नेत असताना त्यांना नाल्याच्या पुलावर फार पाणी दिसले नसावे. त्यामुळेच त्यांनी परत येताना याच पुलावरुन आज पहाटे बस नेण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र रात्रीच्या मुसळधार पावसामुळे हा पुल पाण्याखाली गेला. शिवाय पाण्याला ओढही होती. त्यामुळे बस वाहून गेली.

The 24-year-old driver’s ‘ST’ was carried with 8 passengers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात