प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहर काँग्रेसचा राहुल गांधींना “दणका”; सत्याग्रह यात्रेत दिसणार सावरकर नावाचा महिमा हे घडणार आहे, 10 एप्रिल 2023 रोजी. ठाणे शहरात काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी ठाणे शहरातून काँग्रेस सत्याग्रह यात्रा काढणार असून त्या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फोटोचाही समावेश करण्यात आला आहे.Thane city Congress to incorporate savarkar photo in their satyagrah yatra
सत्याग्रह यात्रेत काँग्रेसच्या विविध स्वातंत्र्य सैनिकांचा आणि पुढाऱ्यांचा तर समावेश राहीलच पण त्याचबरोबर सावरकरांच्याही फोटोचा आवर्जून समावेश करण्यात येईल. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ही माहिती दिली. सावरकरांविषयी राहुल गांधींनी व्यक्त केलेले मत हे अखिल भारतीय काँग्रेसची भूमिका नाही की त्यांचे वैयक्तिक मत आहे सावरकर हे मराठी होते ते महाराष्ट्राचे होते याचा आम्हाला अभिमान आहे, असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला. सत्ताधारी शिवसेना – भाजप यांनी संयुक्तपणे वीर सावरकर सन्मान यात्रा काढली. त्याला जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर केंद्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट घडवताना सावरकर मुद्द्याच्या अडचणीत काँग्रेस सापडली. शरद पवारांना मध्यस्थी करून सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग, भोगलेले कष्ट, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक पुरोगामी सुधारणावादी दृष्टिकोन हे योगदान नाकारता येणार नाही, असे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुनवावे लागले. सावरकर मुद्द्यावर काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले.
या पार्श्वभूमीवर ठाणे शहर काँग्रेसने राहुल गांधींना त्या पुढचा दणका देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो ठाणे शहर काँग्रेसच्या सत्याग्रह यात्रेत समाविष्ट करण्याचे ठरविले आहे. सावरकर नावाचा महिमा आणि त्यानंतर सावरकर गौरव यात्रेचा दणका यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात तरी भूमिका बदलावी लागल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App