ठाकरे विरुद्ध शिंदे : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर एकाच नावावर दोन्ही गटांचा दावा!!

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट या दोघांनीही एकाच नावावर परत एकदा दावा केला आहे “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असे नाव दोन्ही गटांना धारण करायचे आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद आणखी चिघळला आहे.Thackeray vs Shinde: Both groups claim same name after freezing bow symbol

शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसमवेत उठाव केला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटांनी मिळून धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा केला.



या दाव्यानंतर आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं तसेच दोन्ही पक्षांना शिवसेना नाव वापरण्यालाही मज्जाव केला. त्यानंतर आयोगाने दुसरे नाव घेण्यास सांगितले त्यावर आता दोन्ही गट शिवसेना बाळासाहेब ठाकरे या एकाच नावावर दावा करत आहेत. त्यामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे.

आता नावही गोठणार ?

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. मात्र, शिवसेना या नावाच्या पुढे उपनाम जोडता येणार आहे. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने आता आपल्या गटासाठी एकच नाव सुचवले आहे. दोन्ही गटांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी केली आहे. आता, दोन्ही गटाने मागणी केल्याने निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवण्यात येण्याची शक्यता आहे.

Thackeray vs Shinde: Both groups claim same name after freezing bow symbol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात