Raj Thackeray : ठाकरे – पवार सरकारचा कारवाईचा वरवंटा!!; पण मनसे भूमिकेवर ठाम; अनेक कार्यकर्ते भूमिगत, उद्या गनिमी काव्याने आंदोलन!!


प्रतिनिधी

मुंबई : तब्बल 13000 हजार जणांना 149 कलमानुसार नोटिसा, 15000 जणांवर कारवाई असा महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर मनसेने ठाम आहे. पोलिसी नोटिसा आणि कारवाई सुरू होताच अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत आणि उद्या राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गनिमी काव्याने मनसे आंदोलन करण्याच्या तयारीला लागली आहे. Thackeray – Pawar government’s action is a boon !!; But the MNS insists on the role

राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे – पवार सरकारने मशिदींवरचे भोंगे उतरवण्या ऐवजी राज ठाकरे आणि मनसे यांच्यावरच कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे मनसेच्या प्रमुख नेत्यांची आणि मनसैनिकांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांची 149 ची नोटीस आम्ही स्वीकारली असली तरी आम्ही माघार घेणार नाही. रोज कायदे मोडले जात आहेत. कायदे मोडून मशिदी आणि मशिदींवरचे भोंगे उभारत आहेत. त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. पण राज ठाकरे नुसते बोलले तर लगेच पोलिसी नोटिसा आणि कारवाई करत आहेत. हे ठाकरे – पवार सरकार मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे. सरकारचा त्यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे.

– अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरे यांना आधीच यांच्या विरोधात आधीच 2008 च्या केसेचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे आणि त्यापलिकडे जात 13000 मनसैनिकांना नोटीस बजावली असल्याची माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. 15000 जणांवर कारवाई आणि 13000 जणांना नोटीसा, असे या कारवाईचे स्वरूप आहे.

प्रमुख मनसैनिकांना आणि नेत्यांना मुंबई बाहेर जाण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. मनसेवर चहुबाजूंनी कठोर कारवाईचा बडगा उगारून उद्याची महाआरती हाणून पाडण्याचीच तयारी ठाकरे – पवार सरकारने चालवली आहे.

यापुढे महाराष्ट्रात ॲक्शन दिसेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

Thackeray – Pawar government’s action is a boon !!; But the MNS insists on the role

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात