विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ठाकरे – पवार सरकार पुढे सरसावले असून एसटी महामंडळाने रोजंदारीवरील १५०० कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. Thackeray-Pawar government moves forward to break ST strike; Warning to 1500 salaried employees to report within 24 hours
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटीशीत केले आहे. एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
मंगळवारी सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहापर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी ड्युटीवर हजर झाले होते. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे १५०० कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असेही आठवले यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.
एसटीमध्ये सध्याच्या घडीला १२०० ते १५०० रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांनी कामावर यायला हवे अशी आमची अपेक्षा आहे, पण तेही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. उद्या ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची तो निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App