WATCH :ठाकरे- पवार सरकारला आवड १०० कोटींची कशी ? वसुली, नोटीस सुद्धा १०० कोटींचीच : सोमय्या


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार १०० कोटींपेक्षा कमी काही बोलत नाही. मग, ती वसुली असो अथवा नोटीस. आकडा मात्र, नेमका १०० कोटींचा कसा, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.Thackeray-Pawar government Loves 100 crores why ? : kirit somyya

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते अनिल परब ,राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी मानहानीचा दावा करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होते. किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत मानहानीच्या सहा नोटीसा आल्या आहेत.ठाकरे सरकार वसुलीपण १०० कोटींची करते आणि नोटीस पण १०० कोटींची करते. उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना मी घाबरत नाही ,सरकारचे घोटाळे तडीस नेणार .उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याच्या घोटाळ्यासह अनिल परब यांचा रिसॉर्ट असो की हसन मुश्रीफचा साखर कारखाना असो ,या सगळ्या घोटाळ्याना तडीस नेणार आणि सगळ्यावर योग्य ती कारवाई होणार ,हसन मुश्रीफ यांचा साखर कारखाना बेनामी आहे. त्याच्यावर कारवाई करावी,

अशी मागणी इन्कम टॅक्स विभाग आणि इडीकडे केली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.केडीएमसीचे भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात तरुणीने केलेल्या आरोपानंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणी काही चूक केली असेल तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे योग्य चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.

 • ठाकरे- पवार सरकारला आवड १०० कोटींची कशी?
 •  सरकार वसुली करते १०० कोटींची
 •  मानहानीची नोटीस सुद्धा १०० कोटींची
 • वसुली आणि नुकसान भरून काढण्याचे उद्योग ?
 • भ्रष्टाचाराची पाळे मुळे खोदणार, स्वस्थ बसणार नाही
 • परब, मुश्रीफ यांची इन्कम टॅक्स, इडीकडून चौकशी
 • हसन मुश्रीफ यांचा साखर कारखाना बेनामी
 •  उद्धव ठाकरे यांचा बांगला, अनिल परब यांचे रिसॉर्ट
 • कोणाचाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
 • कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही

Thackeray-Pawar government Loves 100 crores why ? : kirit somyya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण