विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात मोदी सरकारवर आरोप करणाऱ्या ठाकरे सरकारचे पायच किती चिखलाचे आहेत हे समोर आले आहे. सरकारविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत एका एसटी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.Thackeray govt frightens ST workers, suspends him for posting offensive posts
प्रविण ज्ञानेश्वर लढी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यवतमाळ आगारात तो कार्यरत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात त्यानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. हा मजकूर पाहून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
प्रविण लढी यांनी व्हॉट्सअॅपवर महाविकास आघाडी सरकार व अनिल परब यांच्याविरोधात पोस्ट केली होती. सरकारचा उल्लेख महावसुली खंडणीखोर असा केला होता. महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटकेस्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला.
पण ऑक्सिजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. १०० कोटी वसुली सरकार, अशी पोस्ट एसटी कर्मचाऱ्याने केली होती.संबंधित कर्मचारी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २० जुलै २०२१ पासून या कर्मचाऱ्याचे एसटी सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. या कालावधीत नियमाप्रमाणे या कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता दिला जाणार आहे, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App