ठाकरे सरकार शक्तिपरीक्षा : राज्यपालांच्या बहुमत चाचणी आदेशाला शिवसेनेचे सुप्रीम कोर्टात आव्हान!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्य सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.Thackeray government power test: Shiv Sena challenges Governor’s majority test order in Supreme Court !!

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील राज्यपालांच्या आदेशा विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता असून सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश देत त्यांच्या आमदारांचे निलंबन 11 तारखेपर्यंत वाचवले आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या जैसे थे परिस्थिती ठेवण्याच्या मुद्द्यावरच शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे



शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपालांकडे आम्ही १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र तो मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. आता बहुमत चाचणीबाबत मात्र ते चांगलीच तत्परता दाखवत आहेत. राफेलपेक्षा राज्यपालांचा वेग जास्त आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

बहुमत चाचणीच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेचे आमदार फोडून भाजप राज्यातील सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

Thackeray government power test: Shiv Sena challenges Governor’s majority test order in Supreme Court !!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात