पुणे पोलिसांकडून चौकशीनंतर अटकेची कारवाई TET Exam: State Examination Council Commissioner Tukaram Supe arrested; Major police action
विशेष प्रतिनिधी
पुणे : टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त पदभार असलेल्या तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील भरती परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करत असतानाच म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून ही माहिती समोर आल्यानंतर म्हाडातील विविध पदांसाठीची परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणात आरोपी डॉ. प्रीतिश देशमुखसह पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाईनंतर घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांना डॉ. प्रीतिश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेचे ओळखपत्र सापडली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App